शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

प्रगत महाराष्ट्राची स्पर्धा स्वत:सोबत करावी

By admin | Updated: October 10, 2016 00:32 IST

प्राथमिक स्तरावरच्या शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी झाला आहे.

अभय परिहार यांचे प्रतिपादन : माध्यमिक मुख्याध्यापकांची सहविचार सभाभंडारा : प्राथमिक स्तरावरच्या शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी झाला आहे. ज्ञानरचनावाद व डिजिटल शाळांच्या माध्यमातून शिक्षणाच स्वरुप पालटले आहे. या सकारात्मक बदल लक्षात घेवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. स्वत:चा शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी स्वत:सोबतच स्पर्धा करावी, असे प्रतिपादन प्राचार्य अभय परिहार यांनी केले.माध्यमिक स्तराच्या विद्यार्थ्यांनी गळती शून्यावर आणणे व विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करावे, यासाठी माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी लालबहादूर शास्त्री शाळा भंडारा येथे माध्यमिक मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेण्यात आली. सभेला उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, हेंमत भोंगाडे, गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, प्राचार्य माया देशमुख, नंदनवार यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सहविचार सभा दोन सत्रात घेण्यात आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर शासन निर्णयाचे २८ पानी शासन निर्णयाचे सुक्ष्म वाचन मुख्याध्यापकांकडून करुन घेण्यात आले. सात जिल्ह्यातील २०१ मुख्याध्यापकांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर जिल्ह्यात यशस्वी करायच असेल तर माध्यमिक मुख्याध्यापक संघटना व विषय शिक्षक संघटना यांनी स्वत: पुढकार घेवून तालुका व जिल्हा स्तरावर कार्यशाळा, सहविचार सभा, परिसंवाद, प्रदर्शनी आदींचे आयोजन केले जावेत. प्रत्येक शाळा मदर स्कूल आहेत. त्या शाळा निश्चित करण्यात याव्यात. शंभर टक्के विद्यार्थी कोणत्याही शाळेत नववीत दाखल होतील. ही संकल्पना मदर स्कूलच्या माध्यमातून पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. सीएसआरच्या सहकार्याने शाळा शैक्षणिक साधनाने परिपूर्ण करता येतील. गळती, निकाल आदी बाबत उत्कृष्ट असणाऱ्या पंधरा शाळांची निवड करण्यात आली. आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामधून स्पर्धात्मक परिक्षांची तयारी केली जाणार आहे. राज्याला देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षकांनी मनापासून मेहनत करावी असेही डायटचे प्राचार्य अभय परिहार म्हणाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, हेमंत भोंगाडे यांनीही मार्गदर्शन केले. आभार उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी मानले. (प्रतिनिधी)शाळा प्रगत करण्यासाठी लोकसहभाग शाळांचे संस्थाचालक समाज तसेच मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मनापासून कार्य केले तर कार्यक्रमाचा हेतू साध्य करणे सोपे होणार आहे.बी. एल. थोरात,शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद भंडारा