भंडारा : आदीवासी बहुल दुर्गम भागात अपंग व्यक्तीमध्ये आपल्या अपंगत्वावर मात करुन सामान्य जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने समोर येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन निराश्रीत कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एम. चौधरी यांनी केले.जागतिक अपंग दिन कार्यक्रम ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा द्वारा आदीवासी विकास प्रकल्प (वाडी) कार्यक्षेत्रातील आलेसूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटक पंचायत समिती तुमसरच्या सदस्या प्रभा पेंदाम, अपंग विकास महामंडळ जिल्हा भंडाराचे अनिल मेराम, अविल बोरकर, आलेसुरचे सरपंच हेमराज मेहर, प्रकल्प समन्वयक सुधिर धकाते, जिल्हा परिषद शाळा आलेसुरचे मुख्याध्यापक मेश्राम, लांजेवार, चिखलीचे उपसरपंच रोशन सावंतवान, खापा येथील पोलिस पाटील रामकृष्ण इळपाते, तंटामुक्ती अध्यक्ष चिखली उमराव कोहले उपस्थित होते. चौधरी म्हणाले शासनाने लादलेल्या जाचक शर्तीमुळे प्रत्येक गरजू विकलांग व्यक्तीला उपकरणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे उदान व्यक्ती, गाव, समाज व व्यापारी वर्ग, गैरशासकिय संस्था यांच्या सहकार्याची नितांत गरज दर्शविली. कित्येक अपंग सुशिक्षीतांच्या हाताला काम नाही म्हणून बेरोजगाराच्या स्थितीत जीवन जगत आहेत. अपंग व्यक्ती हा पुर्णत: दुसऱ्यावर अवलंबून आहे. त्यांना छोटे व्यवसाय प्रशिक्षणाची नितांत गरज या क्षेत्रासाठी आहे. अनिल मेश्राम यांनी अपंग विकास महामंडळ जिल्हा कार्यालय भंडाराच्या योजना व कर्ज प्रशिक्षणाची माहिती उपस्थितांना दिली. अविल बोकर यांनी आलेसूर परिसरात १० गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी या कार्यप्रसंगी केली. त्यानुसार २०० ते ८०० पर्यंत टि. डी. एस. असल्याचे आढळले. यावरुन या परिसरातील पाण्याचे स्त्रोत आरोग्याला धोकादायक आहे ते अपंगत्वाकडे घेऊन जावू शकते. याची भीती व्यक्त केली. याकरिता सार्वजनिक पाणी शुध्दीकरणाच्या योग्य पध्दती करण्याची मागणी ग्रामस्थांनी करावी असे उद्बोधन केले. संचालन कश्मीर मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश कुमार टेंभरे यांनी केले. कार्यक्रमासाठी जग्गनाथ कटरे, संजय सोनवाने, निर्मला उईके, निखिल सावंतवान यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
अपंगांच्या पुनर्वसनासाठी समाजाने समोर येण्याची गरज
By admin | Updated: December 6, 2014 01:05 IST