शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:11 IST

शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, उत्कृष्ट कार्य करणाºयांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, सातबारा संगणकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, डिजीटल शाळा अशा विविध क्षेत्रात जिल्हयाने आघाडी मिळविली असून येत्या काळात जिल्हयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबध्द होऊ या, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते.पोलीस कवायत मैदान येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी परेड निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून कर्जात असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ४७ हजार शेतकºयांना ३११ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीपासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही.याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैअखेर जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँक मिळून ६० हजार ६०० शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला असून यापोटी चार कोटी ८८ रुपयाचा पीक विम्याचा हप्ता भरला आहे, असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.शेतीच्या सुपिकतेसोबतच उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात भंडारा जिल्हयात समाधानकारक काम झाले असून संपूर्ण लोकसहभागातून जिल्हयातील ५२ तलावातून ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला असून यामुळे तलावाच्या पाणी पातळीत नक्की वाढ झाली असून जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.