ईद, गणेश चतुर्थीच्या एकमेकांस शुभेच्छा : उपक्रमाची होतेय प्रशंसाभंडारा : बकरी ईद व गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर शांती, जातीय सलोखा व एकोप्याच्या संदेश समाजाला देण्याच्या उद्देशाने भंडारा येथील मुस्लीम बांधवांनी स्थानिक शितला माता मंदिर, बहिरंगेश्वर देवस्थान, श्री भुशृण्ड गणेश मंदिर, श्री बालपूरी गणेश, भंडाराचा राजा, सन्मित्र गणेश मंडळ गणेशपूर आदी अनेक मंदिर व गणेश पंडालात जाऊन साकडे घातले. ईद व गणेश चतूर्थीच्या एकमेकांचे आलींगन घेऊन शुभेच्छा दिल्या. ग्रिन हेरीटेज सामाजिक संस्थेतर्फे आयोजित या उपक्रमाचे संयोजक, संस्था अध्यक्ष मो. सईद शेख हे होते. संस्थेचे सईद शेख, राधाकिसन झंवर, चंदा मुरकूटे, निता मलेवार, यशवंत गायधनी, शरद लिमजे, विलास केजरकर, मुनव्वर अली तसेच नवाब अली, शादाब मंसूरी, अयान अली आदींनी यात सहभाग घेतला.सर्वप्रथम आदीशक्ती शितला माता मंदिरात संस्थेतर्फे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव निर्वाण यांचे हस्ते देवीला पुष्पहार अर्पण करून प्रसाद वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित ट्रस्टचे ईश्वरलाल काबरा, विश्वहिंदू परिषदेचे अध्यक्ष संजय एकापुरे, बजरंगदलचे अध्यक्ष प्रविण उदापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार जयवंत चव्हाण व इतर भाविकांनी ईद व गणेश चतुर्थीच्या एकमेकांस शुभेच्छा दिल्या.भृशुंण्ड गणेश मंदिरात गणेश मूर्तीला संस्थेतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले. येथील गणेश मंडळचे संचालक निलकंठ मंदूरकर, मनोज बोरकर, कब्रस्थान दर्गा कमिटीचे अध्यक्ष रविंद्र भांडारकर, महेश खानवानी व भाविकांनी मुस्लिम बांधवांचे व ग्रिन हेरिटेजच्या सदस्यांचे आलींगन करून ईद व गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. निलकंठ मंदूरकर यांनी मंदिर कमिटीतर्फे सर्व मुस्लिम बांधव व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला. बहिरंगेश्वर देवस्थानतर्फे ट्रस्टी राधाकिसन झंवर, भंडाराचा राजा येथे ट्रस्टचे मंगेश वंजारी, अजय पशिने व इत्यांदीन उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.सन्मित्र गणेश मंडळ गणेशपूर, बालपूरी गणेश इत्यादी ठिकाणीही भेट देण्यात आली. ग्रिन हेरिटेज संस्थेचे कार्य केवळ पर्यटन व पर्यावरण पुरतेच मर्यादित राहत नाही. मागील अनेक वर्षापासून सामाजिक व जातीय सलोखा, शांती सद्भाव, एकोप्याकरीताही कार्य अव्याहत सुरू आहे. संस्थेचे गायमुख, चांदपूर, अड्याळ येथील हनुमान मंदिर, चकारा महादेव देवस्थान, भुशृण्ड गणेश मंदिर, श्री नृसिंह टेकडी माडगी, नेरला डोंगर महादेव, रावणवाडी, प्राचीन व ऐतिहासिक पवनी, श्री विष्णू मंदि गोसावी मठ भंडारा इत्यादी तिर्थ स्थळांच्या विकासाकरीताही पुढाकार घेवून सामाजिक एकात्मतेची भावना समाजात रूजविली आहे हे विशेष. (प्रतिनिधी)
हिंदू-मुस्लिम बांधवांनी जोपासली बांधिलकी
By admin | Updated: September 17, 2016 00:56 IST