शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामावर या, कारवाई हाेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचारी संपात आहेत. भंडारा विभागातील सहा आगारांतील १४४३ कर्मचाऱ्यांपैकी १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले हाेते. त्यापैकी २०० ते २५० कर्मचारी महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर परतले. मात्र, अद्यापही एक हजार कर्मचारी संपावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना येण्याचे आवाहन करण्यात आले असून, १० मार्चपर्यंत कामावर येणाऱ्या काेणत्याही कर्मचाऱ्याच्या विराेधात कारवाई करण्यात येणार नाही, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. यामुळे आता किती कर्मचारी कामावर येतात हे महत्त्वाचे आहे.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचारी संपात आहेत. भंडारा विभागातील सहा आगारांतील १४४३ कर्मचाऱ्यांपैकी १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले हाेते. त्यापैकी २०० ते २५० कर्मचारी महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर परतले. मात्र, अद्यापही एक हजार कर्मचारी संपावर आहेत. यामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली असून, अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काही बसफेऱ्या सुरू आहेत.तीन महिन्यांपासून संप सुरू असला तरी याबाबत अद्याप काेणताच निर्णय झाला नाही. उलट राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात समाविष्ट करणे अव्यवहार्य आहे असे गत आठवड्यात म्हटले हाेते. त्यामुळे अनेक कर्मचारी कामावर येण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र, आपल्यावर कारवाई तर हाेणार नाही ना, अशी भीती आहे. दरम्यान, महामंडळाने कामावर परतू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत कामावर परतणाऱ्या काेणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट कळविण्यात आले आहे. बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रकांकडे अपील दाखल करायचे आहे. त्यात जाे निर्णय हाेईल त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. आता किती कर्मचारी कामावर येणार, हे लवकरच कळणार आहे.

बसस्थानकावर वाढू लागली गर्दी- भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या भंडारा, गाेंदिया, साकाेली, तुमसर, तिराेडा, पवनी या आगारांतून माेजक्याच कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटीच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसाकाठी ५०० फेऱ्या हाेत आहेत. बस असल्याने आता प्रवासी बसस्थानकावर गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. भंडारा बसस्थानकावरून नागपूरसाठी प्रत्येक तासाला बस असून, प्रत्येक बस प्रवाशांनी खचाखच भरून जाते. मात्र, ग्रामीण भागातील बससेवा ठप्प असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप