शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

आईऽऽ.. तो धूर बंद कर ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

आम्हाला घ्यायला कुणी येतच नाहीये. तू ये ना आई... प्लीज. का गं, कट्टी केलीयस का तू माझ्याशी? माझी काय ...

आम्हाला घ्यायला कुणी येतच नाहीये. तू ये ना आई... प्लीज.

का गं, कट्टी केलीयस का तू माझ्याशी? माझी काय चूक झालीय का? तुला खूप त्रास दिला का मी? पण मी? तर आताशी कुठे जन्म घेतलाय... रडलेही नव्हते. आई, तुला नीट पाहिलंही नाही गं. तू पाहिलंस का मला? तू ये ना गं आई... प्लीज.

आई, निदान त्या डॉक्टर काकांना तरी पाठव ना... त्या मला औषध देणाऱ्या नर्सताई पण इथं नाहीत. कुठे गेले सगळे. किती धूर झालाय सगळा. आम्हाला काहीच दिसत नाहीये. आता श्‍वासही घेता येईना. आई ये की गं... प्लीज.

पण माझा रडण्याचा आवाज तुला येत नसणार ना! इवलुसा आवाज माझा. कुठेच पोहोचेना झालाय गं. माझी ‘कीव कीव’ ह्या रूमच्या बाहेरही जाईना आणि कुणी इकडेही फिरकेना. ये की गं आई.. प्लीज.

आता माझं काही खरं नाही. जीव गुदमरला माझा. श्‍वास येईना. काय करू मी... कुणी आहे का? माझ्या आई-पप्पांना बोलवा प्लीज. कुणीतरी या ना. बघा ना आम्हाला... नाहीतर आम्ही मरून जाऊ!

ऐक ना आई, मी माझ्या पप्पांना अजून नाही बघितलं. त्यांनीही मला नाही बघितलं. त्यांचा स्पर्श मला मिळेल का? आई, बोल ना! का गं इतकी खट्टू झालीस. मी नकोय का तुला? पण तू तर किती हॅपी होतीस माझ्या जन्मानं. तुझे ते पाणावलेले डोळे बघितले होते मी. माझ्या छोटुसा हाताची मूठ सोडवली होतीस... तळहातावरच्या रेषा बघत होतीस. काय कळलं तुला? काय माहीत... पण जाम खूश होतीस तू. आणि मीही. बट आज तुला? इतकी झोप कशी गं लागली? आता मला तुझी जास्त गरज होती बघ. बोल ना... प्लीज.

बरं आई झोप तू. नाही तुला त्रास देणार तसंही आता मी जिवंत राहत नाही बघ. माझा शेवटाचा प्रवास सुरू झाला. किती छोटा प्रवास होता ना माझा. देवानं का जन्म दिला असेन गं मला? काही बघायच्या आतच डोळे बंद करतोय तो माझे. दुष्ट कुठला. आता किती त्रास होईल तुला, त्याचंच टेन्शन आलंय बघ. पण आई तू रडू नको... स्वतःला त्रास करून घेऊ नको. मी जातो आलेल्या मार्गाने.

आई, शेवटचं एक सांगतो. त्या पुढारीकाकांना म्हणावं, आमच्या दुःखाचं राजकारण करू नका. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेवर लक्ष द्या म्हणावं. आम्ही दहाजण तर देवाघरी गेलोच आहोत, पण उरलेल्या सात जणांवर आणि त्यानंतर जन्माला येणारांवर नीट उपचार करा म्हणावं तरच आम्ही वरती आनंदात राहू.

बाय..बाय...आई-पप्पा

तुमचं

(नावही नसलेलं पिल्लू)

(भंडाऱ्याच्या दुर्दैवी घटनेतील चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली)

मन हेलावणाऱ्या या घटनेबाबत उपरोक्त लिखाण कुणी केले व सोशल मीडियावर कुणी अपलोड केले आम्हाला माहीत नाही; परंतु मानवी संवेदनांची ही शब्दकृती आम्ही प्रकाशित करत आहोत.