शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:55 IST

भंडारा वनपरिक्षेत्र विभागाच्या हद्दीतील पांढराबोडी या गावात केशव साकुरे यांचेकडे दोन दिवसांपूर्वी ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ या दूर्मिळ प्रजातीचे घुबड भरकटत आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा वनपरिक्षेत्र विभागाच्या हद्दीतील पांढराबोडी या गावात केशव साकुरे यांचेकडे दोन दिवसांपूर्वी ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ या दूर्मिळ प्रजातीचे घुबड भरकटत आले होते. सदर जखमी घुबडावर तातडीचे उपचार करून घुबडाला नैसर्गिक जिवनशैलीत आल्यानंतर जंगलात सोडून देवून जीवदान देण्यात आले.पांढराबोडी येथील केशव साकुरे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांच्याकडे दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला जखमी अवस्थेत आणून दिले. सदर घुबड हे पंख्याच्या पात्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. त्यावेळी निलय भोगे यांनी त्यांचे वाहन चालक अनिल शळगे यांच्याकडे पुढील उपचारासाठी त्या घुबडाला स्वाधीन केले. शेळगे यांनी वन्यजीव प्रेमी व पक्षी प्रेमी प्रा. डॉ. रवी पाठेकर यांच्या मदतीने तातडीने रात्रीलाच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चिखलकर यांच्याकडे उपचाराकरीता नेले. डॉक्टरांनी घुबडावर त्वरीत उपचार सुरू केले. घुबडाला बाहेरून जखम नसून अंतर्गत जखम असल्याची शक्यता वर्तविली. घुबडाच्या पायात ताकत उरली नव्हती. घुबड अतिशय अशक्त झाले होते. जिवंत राहण्याची शक्यता कमी असलेल्या घुबडाला तंदुरूस्त होण्यासाठी दोन ते तीन दिवस उपचार करण्यात आले. शेवडी डॉ. चिखलीकर व डॉ. रवी पाठेकर तसेच अनील शेळगे यांच्या प्रयत्नांना यश आले व धुबड जखमी अवस्थेतून चांगले झाले व ते आपल्या नियमित जिवनशैलीत येताच डॉ.रवी पाठेकर, अनिल शेळगे, रत्नदिप खोब्रागडे, सुनील साखरवाडे आदींनी त्याला नैसर्गिक जीवन जगण्यास जंगलात सोडून दिले.घुबडाची ओळख पटविण्यासाठी शहानिशा केली असता, सुरूवातीला सदर घुबड हे गरूड घुबड असल्याचे काही पक्षी निरीक्षकांनी सांगितले. परंतु, याची खरी ओळख भंडारा येथील पक्षी निरीक्षक गझाला खॉन व सातपुडा फाऊंडेशन अमरावती व एन.सी.एस.ए मेळघाटचे अध्यक्ष डॉ. किशोर रीठे यांच्याकडून हा घुबड ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ असल्याची पुष्ठी झाली.सदर प्रजातीचे घुबड हे प्रामुख्याने दक्षिण आशिया, उत्तर पाकिस्थान व उत्तर भारतात वास्तव्यास असून हिवाळयाच्या दिवसात इतर पक्षांसोबत ते श्रीलंका, मलेशीया व बांगलादेश या देशामध्ये स्थानंतरीत होतात. या प्रजातीचे घुबडाला दिवसा दिसत नसल्याचे सांगण्यात आलेत्न