शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांमध्ये खडाजंगी

By admin | Updated: August 28, 2015 01:01 IST

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना ‘युजलेस’, ‘नॉट काम्पिटंट’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...

एस.पी.नी म्हटले जिल्हाधिकाऱ्यांना गेटआऊट : आमदार, तहसीलदारांसमक्ष घडला प्रकार, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलनभंडारा : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना ‘युजलेस’, ‘नॉट काम्पिटंट’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘गेट-आऊट’ म्हटले. जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या खडाजंगीमुळे प्रकरण तापले आहे. हा प्रकार आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, तहसीलदार नरेंद्र राचेलवार, सुशांत बनसोडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रताप धरमशी यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारला दुपारी घडला. पवनी येथील तहसील कार्यालयात २५ आॅगस्ट रोजी तहसीलदारांची सभा सुरु असताना एका साप्ताहिकाचे संपादक व अन्य एकाने सभेत जाऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. दुपारी ३ ते ५.४५ वाजेपर्यंत या दोघांचा तहसील कार्यालयात धिंगाणा सुरुच होता. तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांनी याची माहिती संबंधित पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याला दिली. मात्र तब्बल तीन तासानंतर पोलीस तहसील कार्यालयात पोहचले. तहसीलदारांनी स्वत: तक्रार दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. सदर इसमाला जामीन मिळाल्यामुळे तो २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांच्या निवासस्थानी पोहचला. त्यावेळी तहसीलदार हे एकटेच होते. तुला जे काही बोलायचे आहे, ते कार्यालयात येऊन बोल, मी नक्की ऐकेल, असे राचेलवार यांनी त्याला बजावले. मात्र त्याने हुज्जत घातली. या प्रकारामुळे तहसीलदारांसह कर्मचारीही धास्तावले. त्यामुळे त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली. यासंबंधी गुरुवारी दुपारी १२ वाजता पवनीचे तहसीलदार राचेलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भेट घेतली. मागील दोन दिवसांत घडलेला वृत्तांत तहसीलदार राचेलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला. भंडारा नगरपालिकेत कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्याच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जनतेची कामे करणारे अधिकारी व कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य जणांचे काय हाल होतील, असा सवाल उपस्थित करीत जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालावे, अशी एकमुखी मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना केली.धास्तावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके हे बाहेर येऊन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पोलीस अधीक्षकांच्या कक्षात चर्चा चर्चा सुरु झाली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना घटना घडत असतानाही पोलीस वेळेवर कारवाई करीत नाही, असा प्रश्न जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विचारला. पोलीस अधीक्षकांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना ‘यु आर नॉट वर्क प्रॉपरली अ‍ॅण्ड युवर आॅफीसर नॉट टेकिंग अ‍ॅक्शन इमिजीएटली’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘गेट आऊट’ म्हणाले. यावेळी आमदार चरण वाघमारे व अधिकारी उपस्थित होते. यावेळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खडाजंगीत आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही खडेबोल सुनावले. जिल्ह्याच्या वरिष्ठ व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आपण गेट आऊट म्हणत आहात, ही बाब योग्य नाही, असेही आमदार वाघमारे यांनी पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आणून दिले. यावेळी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन गेले. तहसीलदार राचेलवार यांनी पुन्हा तक्रारी दिल्यास नक्की कारवाई करू, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक झळके यांनी दिली. (प्रतिनिधी)महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंदपवनी तहसील कार्यालयात धुमाकूळ घालणाऱ्या साप्ताहिकाचे संपादक मनोहर मेश्राम व सुनिल उपरीकर याच्याविरुद्ध भादंवि ३८३, ३८४, ३८६, ४२७ कलमांतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही .या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यात तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटनेचा समावेश आहे. सदर साप्ताहिकाची नोंदणी रद्द करावी व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची अशी मागणीही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.