शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

जिल्हाधिकारी बंगला परिसराला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:30 IST

जिल्ह्याचे सर्वेसर्वा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवासस्थान (बंगला) सभोवतालचा परिसर समस्यांनी ग्रासला आहे. नाल्या तुंबल्या असून दुर्गंधीमुळे समस्येत वाढ झाली आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होतो.

ठळक मुद्देनाल्या तुंबल्या : दुर्गंधीमुळे समस्येत वाढ, पश्चिम दिशेला दुहेरी सुरक्षा भिंत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचे सर्वेसर्वा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवासस्थान (बंगला) सभोवतालचा परिसर समस्यांनी ग्रासला आहे. नाल्या तुंबल्या असून दुर्गंधीमुळे समस्येत वाढ झाली आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होतो.जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शाळा, महाविद्यालय, बँका यासह अन्य आस्थापने आहेत. बहुतांश शासकीय कार्यालयाचा परिसर हा समस्यांनी वेढलेला आहे. विशेष म्हणजे सिव्हील लाईन परिसरात असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थानही समस्यांच्या विळख्यात आहे. त्यात जिल्हाधिकाºयांचे निवासस्थानही सुटलेले नाही. जिल्हाधिकाºयांचा बंगला आतून झकास असला तरी बाहेरून भकास आहे. निवासस्थान सभोवताल वॉल कंपाउंड असले तरी नाल्या संपूर्णत: चोक आहेत. पावसाचे पाणी वाहून जात नसल्यामुळे तिथेच साचल्या जाते. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे असताना निवासस्थानामागील परिसरात अतिरिक्त लोखंडी जाळी बसवून सुरक्षा कठड्यांची निर्मिती करण्यात आली. येथे असलेल्या फुटपाथ व किरकोळ व्यवसायीकांना हटविण्यात आले होते. जेसीबी लावून नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला होता. मात्र त्यानंतर काम थंडबस्त्यात गेले.सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असून नाल्यांमध्ये केरकचरा व मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. साईमंदिर मार्गावरील जिल्हाधिकाºयांच्या बंगल्यामागील परिसरातील सुरक्षा भिंतीजवळ उत्तर व दक्षिण दिशेला मुतारी आहे. याची अवस्था अत्यंत वाईट आहे. निवासस्थानाच्या उत्तर दिशेला सामाजिक न्याय भवन असले तरी त्या भागाची अवस्थाही हवी तितकी योग्य नाही.राष्ट्रीय महामार्गासमोरील भागही दुर्लक्षित आहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी वाढली असून नाली आहे किंवा नाही असे जाणवते.जिल्ह्याचे मुख्यमंत्री म्हणून जिल्हाधिकाºयांची ओळख असताना त्यांच्या निवासस्थान सभोवतालची अवस्था बघून कुणालाही नवलच किंवा खंत वाटेल, यात शंका नाही.