शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात दस्ताऐवजांचा ढीग

By admin | Updated: January 14, 2015 23:01 IST

तुमसर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनासमोरच्या मार्गावर महत्वपूर्ण दस्तावेजाचा ढीग ठेवलेला आहेत. दस्ताऐवजाने एक खोली तुडूंब भरली आहे. एका खोलीत उपविभागीय

तुमसर : तुमसर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनासमोरच्या मार्गावर महत्वपूर्ण दस्तावेजाचा ढीग ठेवलेला आहेत. दस्ताऐवजाने एक खोली तुडूंब भरली आहे. एका खोलीत उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. येथे दस्ताऐवज ठेवण्याकरिता स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे दस्ताऐवजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तुमसर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अरविंद हिंगे व मडावी यांच्या कार्यालयासमोर मोकळी जागा आहे. या मार्गावर प्रसाधनगृह आहे. या रिकाम्या जागेत महत्वपूर्ण दस्ताऐवज ठेवले आहेत. यात नॉन क्रिमीलेअरचे गठ्ठे आहेत. त्यावर सन २०१२ असे वर्ष नमूद आहे. त्याखाली दस्ताऐवजांचा समावेश आहे. दस्ताऐवजांची खोली दस्ताऐवजाने भरली आहे. दुसऱ्या एका खोलीत उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय असल्यामुळे दस्ताऐवज ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. प्रसाधनगृहाकडे दररोज शेकडोे नागरिकांचे येजा सुरु असते. त्यामुळे हे दस्ताऐवज असुरक्षित आहेत. किमान तहसील प्रशासनाने हे दस्ताऐवज कापडात गुंडाळण्याची गरज होती. शासकीय कार्यालयात दस्ताऐवज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरु होऊन दीड वर्षे झाले. अजूनपर्यंत दस्ताऐवजाकरिता स्वतंत्र खोली नाही. प्रत्येक विभागात कागदांचा ढिग जमा झाला आहे. यासंदर्भात तहसीलदार सचिन यादव यांना संपर्क केल्यावर त्यांनी एका बैठकीत असल्याचे सांगितले. कनिष्ठ लिपीक एन.एस. मानकर यांना विचारले असता दस्ताऐवजाने एक खोली तुडूंब भरल्याचे सांगितले. त्यामुळे हे दस्ताऐवज व्हरांड्यात ठेवले आहे. स्वतंत्र खोली उपलब्ध झाल्यावर हे दस्ताऐवज ठेवण्यात येतील, अशी माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)