शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जवानांकरिता केले जातेय रक्त पिशव्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:30 IST

भारतीय लष्करातील जवानांसाठी सात हजार ८४८ व राज्य शासनाच्या रक्तपेढ्यांकरिता ६५ हजार ४८२ रक्त बाटल्या दान आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. सदर उपक्रम जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीतर्फे राबविले जात आहे. याच अंतर्गत तुमसर तालुकातर्फे नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी २ आॅक्टोबरला सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

ठळक मुद्देतुमसर येथे रक्तदान : लाखनीतही राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारतीय लष्करातील जवानांसाठी सात हजार ८४८ व राज्य शासनाच्या रक्तपेढ्यांकरिता ६५ हजार ४८२ रक्त बाटल्या दान आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. सदर उपक्रम जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीतर्फे राबविले जात आहे. याच अंतर्गत तुमसर तालुकातर्फे नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी २ आॅक्टोबरला सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.रक्तदान शिबिरात माऊलींच्या प्रतिमेचे पूजन व फीत कापून शिबिराची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, म्हाडाचे अध्यक्ष मो. तारिक कुरैशी, डॉ. पंकज कारेमोरे, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार, अनिल जिभकाटे, नायब तहसीलदार पाटील आदी उपस्थित होते. अतिथींनी जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.दैनंदिन जीवनात केवळ पाच मिनिटे रक्त्दानासाठी आवश्यक असल्याची महत्वपूर्ण माहिती उपस्थितांनी याप्रसंगी दिली.गुरूबंधू डॉ. पंकज कारेमोरे, प्रा. कमलाकर निखाडे सह शेकडो भक्तांनी यावेळी रक्तदान केले. संचालन व प्रास्ताविक होमराज वनवे तर आभार संध्या शेबे यांनी मानले. रक्तदान शिबिराला संप्रदायातील भक्तसाधक, शिष्य, रक्तदाते उपस्थित होते.लाखनीत १६० युवकांनी केले रक्तदानलाखनी : जगुरूरू नरेंद्रनाथ महाराज संस्थान व महाराष्ट्र आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीराचे उदघाटन नगराध्यक्षा ज्योती निखाडे व डॉ. संजय पोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत या १६० युवकांनी रक्तदान केले. याप्रसंगी समर्थ महाविद्यालय, सेवक वाघाये कृषी महाविद्यालय येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. विष्णुदास तळवेकर, नागराज कोठेकर, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. राखडे, बाबुराव निखाडे, पद्माकर बावनकर, अ‍ॅड. कोमलदादा गभणे, महेश आखरे, राजू फंदे, देवचंद लोखंडे, मनीष झिंगरे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.