शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

कोरोना टाळण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST

कोरोनाचे वाढते प्रस्थ धोकादायक ठरत आहे. कालपर्यत शहरात असणारा कोरोना ग्रामीण भागात पोहोचलेला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. उलटपणा किंवा बेजबाबदारपणाने कोरोनाला हरवू शकत नाही, याची प्रचिती आजपर्यंत आलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने नकळत त्याचा शिरकाव आपल्या शरीरातून आपण त्याच्या आधीन होऊन जातो.

ठळक मुद्देनिर्जंतुकीकरणासाठी फवारणी। पालांदूरच्या सरपंचाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करीत विनाकारण गर्दी न करता, सोशल डिस्टंन्सिंग सांभाळून सहकार्य करा, असे आवाहन पालांदुरचे सरपंच पंकज रामटेके यांनी केले आहे.कोरोनाचे वाढते प्रस्थ धोकादायक ठरत आहे. कालपर्यत शहरात असणारा कोरोना ग्रामीण भागात पोहोचलेला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. उलटपणा किंवा बेजबाबदारपणाने कोरोनाला हरवू शकत नाही, याची प्रचिती आजपर्यंत आलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने नकळत त्याचा शिरकाव आपल्या शरीरातून आपण त्याच्या आधीन होऊन जातो. प्राथमिक लक्षणावरून त्याची ओळख जरी पटत असली, तरी मात्र आपल्या शरीराचे आरोग्य बिघडण्यासाठी कोरोना धोकादायकच आहे. त्स्वत:चे आरोग्य स्वत: सांभाळा व इतरांना सहकार्य करा, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून पालांदूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंचानी केले आहे.गर्दी न करण्याचे निर्देशकोरोनाचे रुग्ण लक्षात घेता नाहक भाजीपाला बाजारपेठेत, किराणा दुकानात व इतर खरेदी दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग वापरून कमी वेळात खरेदी आटपून गर्दी टाळावी, घराबाहेर अनावश्यक कामानिमित्ताने बाहेर पडू नका. मास्क वापरल्याशिवाय घराबाहेर पडू नका. नाहक गप्पागोष्टी करीत बैठकीच्या ठिकाणी बसू नका. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, अशी सहकार्याची अपेक्षा प्रशासनाने केली आहे.तालुका प्रशासनाची पालांदूरला भेटलाखनीचे तहसीलदार मलिक विराणी, मंडळ अधिकारी राकेश पंधरे, पालांदूर तलाठी कारसाळे, ठाणेदार दिपक पाटील, तसेच स्थानिक प्रशासनाचे पदाधिकारी आदींनी पालांदूर येथील स्थानिक व्यवस्थापनाचे नियोजनाच्या अनुषंगाने आशा वर्कर यांना विहित सूचना देऊन लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत.निर्जंतुकीकरण फवारणीपालांदूर येथील गर्दीच्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने सोडियम पोक्लोराईड या रसायनाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. पंचायत समिती लाखनीमार्फत ग्रामपंचायतला पुरविण्यात आलेल्या रसायनाची फवारणी यंत्रातून मजुरांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रगती कॉलनी व पालांदूर येथील काही भागात गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत कवलेवाडाचे सरपंच केशव बडोले यांनीसुद्धा संकट लक्षात घेता त्यांनीही गावातील वर्दळीच्या ठिकाणी फवारणी केलेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या