शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार क्षेत्रच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:42 IST

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, सहकारी संस्थांनी मालक व वनता विश्वस्त म्हणून कार्य करावे, ....

ठळक मुद्देशेखर चरेगावकर : सहकार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, सहकारी संस्थांनी मालक व वनता विश्वस्त म्हणून कार्य करावे, तरच सहकार चळवळीला गतवैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सहकारी भारती यांचे विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकार परिषदेचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काका कोयटे, उपकार्याध्य सुदर्शन भालेराव, आयकर व जीएसटी व्याख्याता अभिजीत केळकर, सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे, प्रशांत खोब्रागडे, सहकार भारतीचे प्रदेश पतसंस्थेचे प्रकोष्ठ सहप्रमुख सोमेश्वर मते, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा पांढरीपांडे उपस्थित होते.यावेळी शेखर चरेगावकर म्हणाले, जीएसटीमुळे येणारा काळ हा सहकारी संस्थांना चांगले काम करण्यास उत्तम आहे. कोणत्याही प्राचारास बळी न पडता या कराराबाबत सहकार क्षेत्रातील सभासदांनी माहिती करून घ्यावी. तसे मेळावे घेवून प्रबोधन करावे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे करात होणारा बदल समजावून घ्या. त्यामुळे कराबाबत मनात असलेली भीती जाईल व कान्फीडेन्स वाढेल. यासाठी चिंतन करा व बदल स्वीकारा असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्थांनी याबाबत शैक्षणिक सहली आयोजित कराव्यात. त्यामुळे सहकार क्षेत्राचे सक्षमीकरण होईल, असेही ते म्हणाले.यावेळी अभिजीत केळकर यांनी जीएसटी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. काका कोयटे यांनी राज्यातील सहकारी दिंडीमध्ये भंडारा जिल्ह्यातील सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळेच सहकार दिंडीचे यशस्वी नियोजन करता आले, ही भंडारावासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे सांगितले. प्रशांत खोब्रागडे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.प्रारंभी युवक बिरादरीच्या चमूच्यावतीने सहकार क्षेत्रावर आधारित नाट्य सादर केले. प्रास्ताविकात सहाय्यक निबंधक विलास देशपांडे यांनी सहकारी परिषद तसेच कर्जमाफीसंदर्भात माहिती विषद केली. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.