शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही!

By admin | Updated: January 3, 2017 00:27 IST

सहकार क्षेत्र हा ग्रामीण जिवनाचा कणा आहे. सहकार तथा बाजार समित्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी येतो.

चरण वाघमारे : तुमसर बाजार समितीत शेतकरी मेळावा तुमसर : सहकार क्षेत्र हा ग्रामीण जिवनाचा कणा आहे. सहकार तथा बाजार समित्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी येतो. या दोन्ही क्षेत्रात कामे करण्याची गरज आहे. सहकारातील भ्रष्टाचार कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे. तुमसर -मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित शेतकरी प्रतिनिधी मेळावा, चर्चासत्र व शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मोहाडीचे सभापती हरिचंद्र बंधाटे, उपसभापती विलास गोबाडे, आशिष पात्रे, मयुरध्वज गौतम, कलाम शेख, बाबुराव ठवकर, पल्लवी कटरे, उषा बोंदरे उपस्थित होते. यावेळी आ. चरण वाघमारे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात धान घोटाळा उघडकीस आला असून तपासात ४० कोटी रूपयांचा घोटाळा झाला असून हा घोटाळा एकून १०० कोटींचा असल्याचे अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी दिसत आहे. या घोटाळ्याची रक्कम विकासात्मक कामांना द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, सहकारात राजकारण आणता कामा नये, दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. भंडारा व गोंदिया या दोन्ही बँकेचा आढावा घेतला असता, गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या एका शाखेतून १० कोटी गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बँकेचा एनपीए गोंदिया जिल्ह्यात ४० टक्के गेला आहे. २२८ कर्मचारी भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शेतकरी हाच केंद्रबिंदू असावा हा आपला उद्देश आहे. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, तारिक कुरैशी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समितीचे प्रभारी सचिव अनिल भोयर यांनी तर संचालन डॉ. हरेंद्र राहांगडाले यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)