शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसीला ग्राहक मंचाची चपराक

By admin | Updated: December 25, 2014 23:27 IST

विमा धारकाचा मृत्यूनंतर वारसदाराला विमा रकम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय जिवन विमा निगमला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली.

भंडारा : विमा धारकाचा मृत्यूनंतर वारसदाराला विमा रकम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय जिवन विमा निगमला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली.कुंदा अर्जुन कांबळे रा. धर्मापूरी त. साकोली यांची मुलगी दर्शना महेश राजवाडे हिने भारतीय जिवन विमा निगम साकोली येथे एक लक्ष रुपयांची विमा पॉलीसी काढली. त्या विम्याची वार्षिक प्रिमियम ४,८०८ रुपये होती. ही पॉलिसी २८ मार्च २०२९ रोजी मॅच्युअर होणार होती. तक्रारकर्ती कुंदाबाई कांबळे या पॉलिसीमध्ये वारसदार म्हणून नियुक्त करण्यात आली. दरम्यान १३ मार्च २०११ रोजी दर्शना राजवाडे हिचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृत मुलीच्या आईने साकोली येथील शाखा व्यवस्थापकाकडे विमा दावा सादर केला. परंतु विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने विमा दावा निकाली काढला नाही. त्यामुळे कुंदाबाई कांबळे यांनी वकीलाच्या मार्फत भारतिय जिवन विमा निगम विभागीय व्यवस्थापक तथा साकोलीचे शाखा व्यवस्थापक यांना नोटीस पाठविले. मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. यानंतर कुंदाबाईनी भंडारा येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच गाठले. रितसर तक्रार दाखल केली. साक्षपुराव्यांच्या तपासा अंती ग्राहक तक्रार निवारण मंचाने भारतीय जिवन विमा निगमच्या विभागीय व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकांना विमा पॉलिसीची १ लाख रुपयांची रकम तक्रार दाखल दिनांक १४ फेब्रुवारी २०१४ पासून संपूर्ण रकम अदायगी पर्यंत दरसाल दरशेकडा ९ टक्के व्याजासह परत करावी, तसेच तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी १० हजार रुपये व तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये अदा करण्यात यावे. असा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी, सदस्य हेंमतकुमार पटेरिया, गिता बडवाईक यांनी पारित केला. तक्रारकर्तीकडून अ‍ॅड. ए. एम. पटेल यांनी युक्तिवाद केला. (नगर प्रतिनिधी)