भंडारा : लोकसंख्येच्या मानाने नागरी सुविधांचा भंडारा शहरात बोजवारा उडाला आहे. ऊन आणि पावसाच्या खेळात आरोग्याचा प्रश्न जनसामान्यांचा जिव्हारी उठल्यावरही भंडारा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही. पावसाळ्यापूर्वी नगर पालिका प्रशासन नाल्यांची साफसफाई करते मात्र यावेळी ही साफसफाई ८ दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. परिणामी लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करुनही शहरात अस्वच्छता कायम राहणार यात दुमत नाही.भंडारा शहराची लोकसंख्या १ लक्ष २५ हजारांच्या घरात आहे. विशेष म्हणजे स्वच्छतेची जबाबदारी नगर पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाकडे आहे.दरवर्षी आर्थिक बजेटमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येते. त्यानुसार जून महिन्याचा किंवा मे महिन्याच्या शेवटी स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात येते. परंतू यावेळी स्वच्छतेचे काम ११ जून पासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
अस्वच्छतेचा कळस
By admin | Updated: June 19, 2015 00:59 IST