शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ढग जमतात, पण पाऊस बरसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:32 IST

आकाशात ढग दाटून येतात, सोबत मंद वारा वाहतो. क्षणात पाऊस येईल अशी आस मनात तयार होते.

बळीराजा चिंतातूर : २५ टक्के रोवणी पूर्ण, दुबार पेरणीचे संकटमुखरू बागडे। लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : आकाशात ढग दाटून येतात, सोबत मंद वारा वाहतो. क्षणात पाऊस येईल अशी आस मनात तयार होते. ढगांना पोहण मिळते आणि बघता बघता ढग पुढे पुढे सरकत जातात. मनातली अभिलाशा मनातच विरते. पाऊस रिमझिम पडतो न पडतो पुन्हा गायब आणि आकाश निरभ्र होतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित पाऊस पडत नसल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे.मागील तीन वर्षाची परिस्थिती बघता खरीबाच्या आरंभाला पऱ्हे भरणीपर्यंत पाऊस मेहरबान असतो. नंतर मात्र दोन-तीन नक्षत्र अक्षरश: रडवतो. याही हंगामात तीच अवस्था असून पुनर्वसू नक्षत्र सुरु असून १५ जुलैपासून पालांदुरात ३६६.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही नदी नाले कोरडे पडलेले आहेत. ही चुलबंदच्या खोऱ्यातील वास्तविकता आहे.पालांदूर मंडळ कृषी सर्वेनुसार सुमारे २३०० हेक्टरची रोवणी पूर्ण झाली आहे. १७४९ एकुण हेक्टरपैकी १०६९३ हेक्टरवर भात (धान) लागवडीखाली नियोजित केली असून नर्सरीचे नियोजन केले आहे. ६७६ हेक्टरमध्ये आवल्याची पेरणी केली आहे. ७१० हेक्टरमध्ये बांधावर तुर पिकाचे नियोजन असून १३ हेक्टरमध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे. कोरडवाहू शेतकरी रोवणी पूर्वीची संपूर्ण मशागत आटोपून रोवणीची वाट पाहत आहे. निसर्गाच्या अशाच दृष्टचक्राने शेतकरी खरेच कर्जबाजारी होत असून शासन, प्रशासन ही मात्र त्याची चेष्टा करताना दिसतो. कर्जमाफीला अटी व शर्तीची लगाम लावत फसवी कर्जमाफी असल्याची टीका जनसामान्यातून उमटत आहे. बाजारभावाचा अभ्यास करता दोन पैसे अधिक मिळविण्याच्या आशेने हायब्रिड धानाचा पेरा यंदा वाढला आहे. या धानाला विशिष्ट दिवसातच लावले तर अपेक्षित उत्पन्न मिळते. मात्र फसव्या मान्सूनमुळे अधिक उत्पन्नाची आशा फोल ठरत आहे. शेतकरी नव्याने काही करू अपेक्षितो. मात्र पराधिनतेने सर्वकाही मातीमोल ठरत आहे. प्रशासन मात्र कागदावरच अंदाज बांधत आहे. सेवा सहकारी संस्थेंतर्गत चालू हंगामात पीक विमा न काढण्याचा ठराव घेऊन वरिष्ठांना कळविले असूनसुद्धा शासन मात्र सरसकट जबरानजोत पंतप्रधान पीक विमा कर्ज रकमेच्या दोन टक्क्यांनी रक्कम काढण्याचा आदेश दिला आहे. २ टक्के कर्जाच्या रकमेवरील पीक विम्याचा हप्ता खूप मोठी रक्कम होत असून शेतकऱ्यांना नाहक यात गुंतवून त्याची आर्थिक लुट केली जात आहे. पिकविमा हा ऐच्छिक असावा, त्याची जबरदस्ती नसावी अशी आर्त मागणी शेतकरी करीत आहे. लोकप्रतिनिधींनी तरी या मुद्याला हात घालून शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्या, अशी मागणी आहे. पावसाने पाठ दाखविल्याने परिसरातील बळीराजा पुरता हतबल झालेला आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी रोवणी आटोपती घेतली. मात्र, पावसाच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंगावत आहे.