शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चांदपूर जलाशयातील अनाधिकृत बोटींग व्यवसाय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 21:53 IST

ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळी असलेल्या जलाशयात काही तरुण संस्थेचे डोंग्याचे अनाधिकृत बोटींग व्यवसाय करीत होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संस्थेने जलाशयातून डोंगा हटविला आहे. या अनाधिकृत बोटींग व्यवसायावर संस्थेने बंदी आणल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देदुरुपयोगावर संस्थेचे नियंत्रण : जलाशयातून डोंगा हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळी असलेल्या जलाशयात काही तरुण संस्थेचे डोंग्याचे अनाधिकृत बोटींग व्यवसाय करीत होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संस्थेने जलाशयातून डोंगा हटविला आहे. या अनाधिकृत बोटींग व्यवसायावर संस्थेने बंदी आणल्याची माहिती मिळाली आहे.ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळात असणाऱ्या जलाशयात मत्स्यपालन आणि मासेमारी करण्याचे ५ वर्षाचे कंत्राट चांदपूर येथील मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेला मिळाले होते. जलाशयात मत्स्यपालन आणि मासेमारी करीत असतांना जलाशयात भ्रमंती नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेने डोंगा खरेदी केला आहे. या डोंग्याने संस्थेचे पदाधिकारी जलाशयात मासेमारी, मासे चोरी प्रकारावर आळा घालण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु ३१ मार्च रोजी संस्थेचे कंत्राट संपले असल्याने मत्स्यपालन व मासेमारी बंद करण्यात आली आहे. या शिवाय जलाशयात बिजोत्पादन प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. जलाशयात असणाऱ्या कंत्राट पध्दती संपुष्टात आल्याने संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या जलाशयात असणारे कंत्राट संपले असले तरी मत्स्य विभागाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवण्याचे सूचना दिल्या आहेत. यामुळे संस्थेने जलाशयातून डोंगा हटविण्याची तसदी घेतली नाही. परंतु याच डोंग्याचा काही तरुण अनाधिकृत बोटींग व्यवसायाकरिता उपयोग करीत असल्याचे दिसून आले. पर्यटकांकडून शुल्क घेत असल्याचे निदर्शनास आले. जलाशयात नियंत्रण ठेवण्यासाठी डोंगा असतांना अनधिकृत बोटींग व्यवसायातून पर्यटकांचे जीव धोक्यात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले.संस्थेच्यावतीने या अनधिकृत व्यवसायाची चौकशी केली असता आश्चर्य झाले. जलाशयात बोटींग व्यवसायाची परवानगी नसतांना काही अप्रशिक्षीत तरुण या डोंग्याचा दुरुपयोग करीत असल्याने संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांनी डोंगा जलाशयातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.जलाशयात कुणी डेंग्याचा दुरुपयोग करतांना आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल.- शांताराम शहारेअध्यक्ष, मत्स्यपालन संस्था, चांदपूर