ऑनलाईन लोकमत भंडारा : राज्य सरकारने ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न प्रारंभ केला आहे. यामुळे महा ई सेवा केंद्र चालकांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. यामुळे राज्य सरकारने आपले सरकार सेवा केंद्र सुरू करू नये यासाठी जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र संचालक संघटनेने एक दिवसीय बंद पुकारला होता. यात जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र बंद असल्याने याचा परिणाम पडला.महाआॅनलाईनच्या माध्यमातून राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना संगणक केंद्र दिले असून त्यात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या महाआॅनलाईन चालकांच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम पडून केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपले सरकार केंद्र सुरू न करता महा ई सेवा केंद्र चालकांना पाठबळ द्यावे या मागणीसाठी आज राज्यात एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. यात भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील केंद्र चालकांनी यात सहभाग घेऊन बंद यशस्वी केला.महा ई सेवा केंद्र चालकांच्या व्यवसायाला बंद करण्याचा हा घाट राज्य सरकारने रचना आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्र चालकांनी बंदला पाठींबा दिला. त्यामुळे शासनाचे लाखोंचे महसूल बुडून आले. राज्य सरकारने यावर तोडगा न काढण्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल.-संजय मते, जिल्हाध्यक्ष महा सेवा संघटना भंडारा.
महा ई सेवा केंद्रचालकांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:44 IST
राज्य सरकारने ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न प्रारंभ केला आहे. यामुळे महा ई सेवा केंद्र चालकांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे.
महा ई सेवा केंद्रचालकांचा बंद
ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व केंद्र बंद : जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन