शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

मारहाणीच्या निषेधार्थ अड्याळ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:02 IST

जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करणारे वाहन ग्रामस्थांनी पकडल्यानंतर अवैध तस्करांनी ग्रामस्थांनाच मारहाण केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारला अड्याळवासीयांनी कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर अड्याळ व परिसरातील हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.

ठळक मुद्देग्रामस्थ, महिला मोर्चात सहभागी : सीबीआयकडून चौकशीची मागणी

विशालरणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करणारे वाहन ग्रामस्थांनी पकडल्यानंतर अवैध तस्करांनी ग्रामस्थांनाच मारहाण केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारला अड्याळवासीयांनी कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर अड्याळ व परिसरातील हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.पोलीस प्रशासनाने आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली परंतु या मारहाणीत काही महिला व मुख्य आरोपी बाबु पटेल यांचा समावेश असतानाही समाधारकारक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ही घटना घडली तेव्हापासून दोन दिवसात भंडारा जिल्ह्यातील ७२ गोतस्करांवर कार्यवाही करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हा पोलीस एवढी मोठ्या प्रमाणात कारवाई करतात आधीच हे धाडसत्र सुरू असते तर ही घटना घडली असती का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.अड्याळ व परिसरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. त्यांच्याकडून चिरीमीरीची मोठी देण दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला.दरम्यान, सौंदड, खापरी पुनर्वसनवासियांनी रविवारला रात्री घेतलेल्या बैठकीत विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व ग्रामवासीय सहभागी होते. या बैठकीत गो-तस्करी व घरात घुसून महिलांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून जिल्ह्यतून तडीपार करण्यात यावे,पोलीस ठाण्यात आलेल्या ग्रामस्थांवर लाठीमार करण्यात आला. तो आदेश कुणी दिला? मुख्य आरोपी मोकाट का? घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असणाºया पोलीस कर्मचाºयांना निलंबित करा आणि जखमींना शासकीय मदत देण्यात यावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.हा तर आरोपींनी केलेला सामूहिक हल्लागो-तस्करीचा अवैध व्यवसाय संपूर्ण भंडारा जिल्हाभर सुरु आहे. हा व्यवसाय करणाºयांमध्ये गुंड प्रवृत्तीचा लोकांचा समावेश आहे. हे अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या पाठबळाने सुरु बिनदिक्कतपणे सुरू आहेत. अड्याळ येथील घटना आरोपींनी ग्रामस्थांवर केलेला सामूहिक हल्ला आहे. या प्रकरणातील संपूर्ण आरोपींना अटक करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चमूकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकाुपरे यांनी केली.