भंडारा : देशभरातील २.५ लाखापेक्षा अधिक विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी उद्या २ सप्टेंबरला ११ मध्यवर्ती कामगार संघटना व राष्ट्रीय औद्योगिक फेडरेशनच्या आवाहनानुसार केंद्र सरकारच्या जनता व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात एकदिवसीय अखिल भारतीय देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार आहेत.देशातील औषध उद्योगासहित संरक्षण, रेल्वे, विमा व किरकोळ व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक बंद करा, भारतातील यु.एस.एफ.डी.ए. चे कार्यालय बंद करा तसेच औषध उद्योग क्षेत्रातील आस्थापने यांचे पुनरुज्जीवन करा, जीवनावश्यक औषधांवरील अबकारी व विक्री कर रद्द करा, विक्री संवर्धन कर्मचारी कायद्यानुसार सर्वच वैद्यकीय प्रतिनिधींचे कामाचे स्वरुप कायद्याद्वारे निश्चित करा, तसेच किमान वेतन २० हजार घोषित करा, नकली व बनावटी औषध कंपन्यांवर कारवाई करा, वैद्यकीय प्रतिनिधींना तासांचे काम द्या, औद्योगिक त्रिपक्षीय समितीची स्थापना करा, महिला वैद्यकीय प्रतिनिधींना ६ महिन्यांची बाळंतपणाची रजा द्या, तसेच सर्व कामगार कायद्यातील मालक धार्जीणे व कामगार विरोधी बदल रद्द करा, देशासाठी संपत्ती निर्माण करण्या, देशाचे निर्माण करणाऱ्या व मालक वर्गाचा नफा ज्यांच्या श्रमावर अवलंबून आहे अशा देशाीतल कामगार वर्गावर होणाऱ्या हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी व त्यांना परतवून लावण्यासाठी सर्वच कामगार संघटनांच्या संयुक्त समितीने देशव्यापी बंद ची हाक दिली आहे. सकाळी ११ वाजता संघटनेच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे. (शहर प्रतिनिधी)
आज देशव्यापी बंद
By admin | Updated: September 2, 2015 00:23 IST