शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद; अडीच हजार ज्येष्ठांसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST

भंडारा : ­कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. मात्र, नियमित तपासणी सुरू आहे. आधीच कोविड संसर्गामुळे ...

भंडारा : ­कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. मात्र, नियमित तपासणी सुरू आहे. आधीच कोविड संसर्गामुळे रुग्णांमध्ये भीती व्याप्त आहे. नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी ज्यांचा मोतीबिंदू पिकला आहे, तेही कोरोनाच्या धास्तीमुळे शस्त्रक्रिया करायला पुढे येत नाहीत किंवा कुणी शस्त्रक्रिया करायला आले तरी त्यांची शस्त्रक्रिया सध्याच्या परिस्थितीमुळे करता येत नाही.

भंडारा जिल्ह्यातील अडीच हजारांवर ज्येष्ठ नागरिकांच्या शस्त्रक्रिया न झाल्यामुळे त्यांच्यापुढे अंधार आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतात. कोरोना सुरू होण्यापूर्वी वर्षाकाठी तीन हजारांवर नेत्र शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु, कोरोनामुळे आधी सहा महिने व त्यानंतर आता गत दोन महिन्यांपासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नेत्र शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना ठेवण्यात येणारे वॉर्ड कोविड रुग्णांसाठी दिल्याने या नेत्र शस्त्रक्रिया सद्य:स्थितीत तरी बंद आहेत. या विभागासमोरच कोविड ब्लाॅक आहे. गत वर्षी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात ५४५ नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांसाठी नेत्र वॉर्ड देण्यात आल्यामुळे गोरगरीब रुग्णांसमोर आता अंधार पसरला आहे.

कोरोनामुळे नेत्र चिकित्सा विभाग बंद होते. मागील आर्थिक वर्षापर्यंत नेत्र शस्त्रक्रिया ५४५ झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तसेच नेत्र विभागात कोविड रुग्ण असल्याने शस्त्रक्रिया करणे बंद आहे. सद्य:स्थितीत नेत्र तपासणी सरू आहे. आगामी काळात स्थितीचे अवलोकन करून नेंत्र शस्त्रक्रिया सुरू करण्यात येतील.

-डॉ. निखिल डोकरीमारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.

कोरोना संसर्गामुळे नेत्र शस्त्रक्रिया बंद आहे, याची माहिती नव्हती. तपासणी झाली, पण शस्त्रक्रिया होणार नाही, हे वेळेवर कळले. आता गत दोन महिन्यांपासून नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. आता खासगीत जाऊन शस्त्रक्रिया करावी लागणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे. औषध मिळाले आहे.

-कल्पना पुसाम, तुमसर

कोरोनामुळे नेत्र शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. डोळ्यांतील मोतीबिंदू पिकले आहे. सध्या शस्त्रक्रिया करणे बंद आहे. डिसेंबरपासून शस्त्रक्रिया सुरू झाल्याची माहिती होती. त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो होतो; पण आता ऑपरेशन होणार नसल्याने फक्त ड्राॅप आणि औषध देऊन घरी पाठविण्यात आले.

- कोठीराम चोपकर, भंडारा

कोरोनामुळे अन्य आजारांकडे दुर्लक्ष करण्यात आले काय असे वाटत आहे. डोळ्यांच्या समस्या वाढल्याने तपासणीसाठी यावे लागले. परंतु कोरोनाच्या धास्तीमुळे नेत्र शस्त्रक्रिया कुणी करायलाच तयार नाही. रुग्णालयात केव्हा शस्त्रक्रिया सुरू होणार याची नेमकी माहिती नाही.

- लता किरणापुरे, लाखनी