शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:21 IST

वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात तीन वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील ६५ महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे. नगर परिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून तब्बल ६८ लाख ७७ हजार रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कुणालाही झाला नाही.

ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : ७० लाखांचा खर्च व्यर्थ, ६८पैकी तीन कॅमेरे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात तीन वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील ६५ महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे. नगर परिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून तब्बल ६८ लाख ७७ हजार रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कुणालाही झाला नाही.नगर परिषदेच्या वतीने नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने ७२ लाख १९ हजार रुपयांचा खर्चाला मंजूरी प्रदान केली. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळवून एका कंत्राटदाराला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे कंत्राट देण्यात आले. शहरातील १७ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. देखभाल दुरुस्तीची व्यवस्थाही करण्यात आली. या कॅमेरांचा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला. यातून संपूर्ण शहरावर तिसºया डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरु झाले. पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होवू लागली. परंतु देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे चालेनासे झाले. आता नादुरुस्ती झालेल्या कॅमेराकडे कुणी लक्षही देत नाही. शहरातील ६८ पैकी केवळ तीन कॅमेरे सुरु आहेत. नगर परिषदेने नामवंत कंपनीचे कॅमेरे खरेदी केले असतांना काही महिन्यातच कॅमेरे नादुरुस्त झाले. त्यामुळे कॅमरेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.येथे लागले होते सीसीटीव्ही कॅमेरेखांबतलाव चौक, छोटा बाजार चौक, एमआयडीसी वसाहत, हत्तीखाना चौका, सामान्य रुग्णालय चौक, नागपूर नाका चौक, पोस्ट आॅफीस चौक, मिस्कीन टँक चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, बसस्थानक चौक, मोठा बाजार चौक, गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, शितलामाता चौक, त्रिमुर्ती चौक, शास्त्री चौक या ठिकाणी कॅमेरा लावण्याचे निश्चीत झाले. बहुतांश ठिकाणी कॅमेरे लावण्यातही आले.हल्लेखोरांना पकडण्यात आले होते यशभंडारा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गुन्हेगारांना वटणीवर आणण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले होते. शहरात घडलेल्या प्रिती पटेल व शिंदे कुटूंबावरील हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनेच गाठले होते. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यावेळी कुणीही गुन्हा करतांना दहावेळा विचार करीत होता. पंरतु आता कॅमेरेच बंद झाल्याने गुन्हेगारांना मोकळे रान झाले आहे.