शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

झरी उपसा सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून प्राधान्य मिळत असले तरी अठरा वर्षांपासून झरी उपसा प्रकल्प राजकीय उदासीनतेचा बळी ठरला होता. या ...

सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाकडून प्राधान्य मिळत असले तरी अठरा वर्षांपासून झरी उपसा प्रकल्प राजकीय उदासीनतेचा बळी ठरला होता. या अपूर्ण प्रकल्पामुळे लाखांदूर तालुक्यातील सुमारे अडीच हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित होती. झरी (मुर्झा) हे गाव डोंगराळ भागात असून, विस्तीर्ण वनराईत आहे. इटियाडोह धरणाचा अर्जुनी मोरगाव येथील मुख्य कालवा झरी तलावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. धरणात झरी उपसा सिंचन योजना प्रकल्पासाठी हक्काचे १२.९४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. या दरम्यान कालवा तयार केल्यास ३५ दुष्काळी गावातील २ हजार १९५ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येऊन सुमारे एक लक्ष लोकांना सिंचनाचा लाभ मिळू शकतो.

२२ एप्रिल २०१० च्या परिपत्रकानुसार या प्रकल्पाला २५ कोटी व त्यापेक्षा अधिक किमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ‘झरी उपसा सिंचन योजना प्रकल्प’ असे नामकरण करण्यात आले होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अंतर्गत इटियाडोह प्रकल्पाच्या नियोजनातून १२.९४ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा सिंचन योजनेकरिता उपलब्ध करून देण्याची मान्यता शासनाने दिली असल्याचे पत्र तत्कालीन शासनाचे उपसचिव प्र. ना. घोडके यांनी कार्यकारी संचालकांना दिले होते. ३० जून २०१२ रोजी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ प्रधान सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांना झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता टप्पा १ च्या कामाचा प्रस्ताव मान्यतेकरिता सादर केले होते. मात्र, मध्येच माशी शिंकली आणि पुन्हा हा प्रकल्प अडगळीत पडला. दरम्यान, ३० जानेवारी २०२१ रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता लाखांदूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बालू चुन्ने यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करून झरी तलाव प्रकरण मार्गी लावण्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांनी निवेदनकर्त्यांना प्रकल्पाचे दस्तऐवज घेऊन मुंबई मंत्रालयात पाचारण केले होते. या चर्चेअंती इटियाडोह धरणाच्या अर्जुनी/मोरगाव येथील मुख्य कालव्यापासून झरी तलावापर्यंत पाच किलोमीटर अंतराचा कालवा बनवून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासंबंधी पत्र जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा मार्फत कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना सादर करून झरी उपसा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे आता १८ वर्षांपासून वनवासात असलेल्या या प्रकल्पाला गती मिळणार असून, ३५ गावांतील शेती सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.