शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता रॅलीने वेधले तुमसरकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 22:22 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागरिकांना सहभागी करता यावे, यासाठी नगरपरिषद तुमसरने स्वच्छता सर्व्हेक्षण रॅली काढली. शहरातून निघालेल्या या स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीने तुमसरकरांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देशहरात जनजागृती: संत निरंकारी महिला मंडळाचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागरिकांना सहभागी करता यावे, यासाठी नगरपरिषद तुमसरने स्वच्छता सर्व्हेक्षण रॅली काढली. शहरातून निघालेल्या या स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीने तुमसरकरांचे लक्ष वेधून घेतले.शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेसाठी तुमसर नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता अ‍ॅपही तयार करण्यात आला आहे. भ्रमणध्वनीद्वारे स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तुमसर नगर परिषदेने आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करून जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.जास्तीत जास्त लोकांचा सहभाग या मिशनमध्ये व्हावा याकरिता स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीचे आयोजन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व उपाध्यक्ष कांचन कोडवानी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. सदर स्वच्छता रॅलीचा गभने सभागृहातून प्रारंभ करण्यात आला. ही स्वच्छता रॅली तुमसर शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचे समापन करण्यात आले. या रॅलीत प्रथम:च सिंधी समाजाचे संत निरंकारी महिला मंडळाने सहभाग नोंदविला होता.याचबरोबर लॉयन्स क्लब तुमसर, सिंधु युवा समिती, नगरपरिषद नेहरू विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, शारदा विद्यालय, यु.एस.ए. विद्यानिकेतन शाळेसह अन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता. तसेच मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक सुनिल पारधी, अमरनाथ रगडे, प्रमोद बरडे, डॉ. गोविंद कोडवानी, ललीत थानथराटे, कल्याणी भुरे, आशिष पडोळे, राजा लांजेवार, मेहताब ठाकूर, वर्षा लांजेवार, शारदा बचत गटाच्या स्वच्छतादुतांनी सहभाग नोंदविला.