शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ‘खो’

By admin | Updated: December 17, 2015 00:49 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू करण्याचे आदेश आहेत.

भंडारा : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू करण्याचे आदेश आहेत. परंतु या अभियानाची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे भंडारा जिल्ह्यातील एकंदरित परिस्थितीवरून दिसून येते. शहरे हागणदारीमुक्त करणे व २ आॅक्टोबर २0१८ पर्यंत शहरातील घनकचरा शंभर टक्के गोळा करणे, त्याची वाहतूक करणे व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी मिशन मोड पद्धतीने करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील नगर परिषदांद्वारा हे अभियान ज्या संथगतीने राबविण्यात येत आहे ते पाहता २ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त आणि २ आॅक्टोबर २०१८ पर्यंत शहरातील घनकचरा शंभर टक्के गोळा करण्याचे उद्दिष्ट प्राप्त करणे शक्य होईल, असे वाटत नाही. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या इच्छाशक्तीची कमी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला राज्य शासनाकडून आपल्या शहरात स्वच्छता, हागणदारीमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयांवर अभियान राबविण्यात येत आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही. जर सर्वसामान्य नागरिकांना माहितीच नाही, तर नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे अभियान वेळेत पूर्णत्वास जाईल, याबाबत शंकेला मोठा वाव आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारी मुक्त होणाऱ्या शहरांची तपासणी करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी ज्या कुटुंबाकडे शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जातात अशा कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय अथवा सामूदायीक शौचालय उपलब्ध करून द्यावयाची आहेत. याबाबत गठीत करण्यात आलेली समितीने तपासणी करावयाच्या शहरास किमान दोन दिवस भेट देऊन शहराची पाहणी करणे अपेक्षित आहे. यामध्ये शहरातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही, याची पाहणी महत्वाची आहे. शहरातील तरंगती लोकसंख्या लक्षात घेता शहरात आवश्यक अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालये पुरेशा प्रमाणात आहे का तसेच त्याचा वापर होतो का, याची पाहणी ही समिती करणार आहे. उल्लेखनिय म्हणजे या समितीने शहरातील अशा भागाला पहाटेच्या आणि रात्रीच्या सुमारास भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय समिती आपला अहवाल सबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे तर राज्यस्तरीय समितीने आपला अहवाल नगर विकास विभागाला सादर करणे आवश्यक आहे. शहर हागदारीमुक्त घोषीत करणे व त्याची तपासणी करण्याबाबत काही टप्पे निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार शहर हागदारीमुक्त झाल्याची स्वयंघोषणा करणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्राथमिक तपासणी आणि राज्य शासनामार्फत तपासणीक केंद्र शासनामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात मात्र स्वच्छता अभियानाबाबत नगर परिषदांमध्ये कोणताही उत्साह दिसून येत नाही. या अभियानाची जी संथगतीने सुरूवात जिल्ह्यात सुरू आहे, ती आश्चर्यजनकच आहे. (प्रतिनिधी)