शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकच्या नादात क्लिनरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:28 IST

ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या दोन ट्रक व ट्रेलर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे घडली. पप्पू कुमार रंजवाल (२४) रा.मरार (झारखंड) असे मृताचे नाव आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले.

ठळक मुद्देतीन ट्रकचा अपघात : भिलेवाडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या दोन ट्रक व ट्रेलर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे घडली. पप्पू कुमार रंजवाल (२४) रा.मरार (झारखंड) असे मृताचे नाव आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले.इंद्रजीत राजूप्रसाद शाहू (२७) रा.रामगड (झारखंड), मोहम्मद नौशाद उर्फ नूरमहोम्मद शेख (३२) रा.दरभंगा (बिहार) व महोम्मद इसराईल मोहम्मद गुलजार (२६) रा.मधुबनी (बिहार) असे जखमींची नावे आहेत. जखमींवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील जवळपास तीन तास वाहतूक ठप्प होती. याचा अनेकांना फटका बसला. नागपूरवरून येणाऱ्या वाहनांना शहापूर-हत्तीडोई मार्गे वळविण्यात आले होते. तर साकोली ते भंडाराकडे येणाºया प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला.रायपूर येथून नागपूर येथे सुपारीचे पोते घेऊन जाणारा ट्रक क्रमांक डब्लूबी ११ डी ४६८६ हा जात असताना त्याचवेळी नागपूरकडे जाणारा १४ चाकी ट्रेलर क्रमांक आरजे १९ जीडी ०७७१ ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०४ एचव्ही ७११३ याला धडक दिली. परिणामी मागे असलेल्या ट्रेलरनेही दोन्ही ट्रकांना जाऊन टक्कर दिली. या अपघातात सीजी ०४ एचव्ही ७११३ मधील क्लिनर पप्पूकुमार रंजवाल हा फसल्या गेल्याने तसेच गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ट्रेलरमध्ये दोन इसम प्रवास करीत होते. मात्र त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. या प्रकरणी विरमाराम मेघवाल रा.शिवनगर जिल्हा बाडमेर यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास पीएसआय रुपाली फटींग करीत आहे