शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरचं स्वच्छ अन् घरचं खरखटं ठेवायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:48 IST

गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते.

ठळक मुद्देकान्हळगावचा कारभार : गावात अस्वच्छता व रोगराई

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते. घरचे खरखटं ठेवायचे अन् बाहेरचे स्वच्छ करायचे असंच चित्र सध्या कान्हळगाव / सिरसोली येथील गावात होत आहे.कान्हळगाव (सिरसोली) येथील सरपंच गावी राहत नाही. मोहाडी येथे राहून गावाचा कारभार चालवित आहेत. गावातील एकही नाल्या स्वच्छ केलेल्या नाहीत. कोणत्याही वॉर्डात जा, कुठे नाल्या रेती मातीने बुजलेल्या तर कुठे पाण्याने साचलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी नाल्या आहेत काय याचा शोध घेण्यास उशिर लागतो. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी नाल्यावरच अतिक्रमण केले आहे.नालींमध्ये पाणी साठवण होत आहे. त्यामुळे नालींमधील पाण्याचा निचरा होत नाही. त्या कारणाने मोठ्या प्रमाणात नाल्या डासांची निर्मिती केंद्र बनली आहेत. स्वाभाविकच गावातील जनतेला रोगराईचा सामना करावा लागत आहे. गावातील कचरा कधीच साफ केला जात नाही. त्यामुळे चौकात व वाटेने कचरा पडलेला दिसतो.आठवडी बाजारातील कचरा कधीच साफ केला जात नाही. नवीन नालीचे बांधकाम केले जाते. मात्र ज्या नाल्या तयार झाल्या आहेत त्यातील पाणी प्रवाहित होतो काय? कुठे नाल्या बुजल्या आहेत याची साधी पाहणीही गावातील सरपंच करीत नाही. सरपंच मोहाडी येथे राहत असल्याने गावाचा कारभार असाच सुरु आहे. गावातील समस्या, जनतेच्या समस्या जाणून घेण्याची वेळ कधीच सरपंच यांना मिळत नाही.सिरसोली / डोंगरला या टी पॉइंटवर अकरा वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. त्यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले यांनी भूमिपूजन केले होते. पण त्यानंतर गावाच्या सत्तेत आलेल्या सरपंचांनी कवडीचाही लक्ष दिला नाही. आधी पती व आता पत्नीच्या हाती गावचा कारभाराची सूत्रे हे गावकऱ्यांनी सोपविली. पण मोहाडी येथे राहून सरपंच गावाचा विकास साधत नसल्याचे गावकऱ्यांना दिसू लागले आहे. त्या गुरुदेव चौकात काही लोकांनी जनावरे बांधण्याचा काम चालविला आहे. गुरुदेव चौक नामकरण झालेल्या जागेत जनावरांचे शेण, मुत्र त्या भूमिपूजनाच्या दगडावर जात आहे. अशावेळी तरी सरपंचांनी लक्ष देणे आवश्यक होते. पण केवळ सत्ता गाजवायचे, गावाच्या अस्वच्छतेकडे लक्ष द्यायचे नाही असाच विचार सरपंच करीत आहेत. मात्र घरच्या शेजारील नाली साफ करून फोटो काढायची व स्वच्छता करीत असल्याचे भासवून फुकटची प्रसिद्धी मिळवून स्वत:च्या पाठीवर शाबासकीची थाप स्वत:च द्यायचा प्रकार दिसून आला आहे. गावातील सर्व नाल्या मोकळ्या करण्यात याव्या व गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.