शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग चार... विद्यार्थी चार... शिक्षक एक

By admin | Updated: September 30, 2014 23:31 IST

इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडल्या आहेत. भंडारा नगरपालिकेच्या बजाज प्राथमिक शाळेची मोठी दैनावस्था निर्माण झाली आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा फटका : पालिकेच्या तीन शाळा पडल्या बंदप्रशांत देसाई - भंडाराइंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडल्या आहेत. भंडारा नगरपालिकेच्या बजाज प्राथमिक शाळेची मोठी दैनावस्था निर्माण झाली आहे. शाळेत चार वर्ग आहे. यात फक्त चार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वर्ग पहिलीला एकही विद्यार्थी नसून चार विद्यार्थ्यांकरिता एक शिक्षक व महिला शिपाई येथे कार्यरत आहे. यापूर्वी पालिकेच्या तीन शाळा बंद पडल्या आहेत, हे विशेष.भंडारा नगरपालिकेच्या वतीने शहरात चार शाळा सुरू आहेत. १९३४ पासून बजाज प्राथमिक शाळा चालविण्यात येत आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरविण्यात येत आहे. मात्र यावर्षी शाळेवर अवकळा आली आहे. इयत्ता पहिलीला एकही विद्यार्थ्याचा प्रवेश नाही. दुसरीला एक, इयत्ता तिसरीला दोन तर चौथीला एक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे शिक्षण घेणाऱ्या चौघीही मुलीच आहेत. जयश्री गणेश चाचेरे, निकिता ठाणेश्वर सोनवाने, चेतना प्यारेलाल निपाने व रूत दिनेश रामटेके अशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनिंची नावे आहेत. शाळाचा आवार फार मोठा असून तिथे पूर्वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे नऊ वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. सध्या दोन खोल्यांमध्ये शाळेचे काम चालत असल्याने उर्वरीत सात वर्ग खोल्या बंद आहेत.पालिका प्रशासनाने चार विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेला सुरेश काशिराम मेश्राम यांची शिक्षक म्हणून नेमणुक केली असून तेच मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळीत आहेत. त्यांच्या सोबतीला अनिता शेंदरे या शिपाई म्हणून काम सांभाळत आहेत. शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावत असल्याने येथील बंद वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली असून शाळा परिसरात शेळ्या व इतर पाळीव जनावरे तिथे बस्तान मांडून असतात. पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, कस्तुरबा प्राथमिक शाळा व नरकेसरी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहेत. हिच परिस्थिती बजाज शाळेवर येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी विविध योजना अस्तित्वात आणल्या आहेत. 'स्कूल चले हम' चा नारा देत विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती यासह अनेक योजनांवर लाखोंचा खर्च करण्यात येतो. असे असले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांवर अवकळा आली आहे.भंडारा नगरपालिकांतर्गत नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा चालविण्यात येत आहे. सध्या प्रत्येक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश देण्यासाठी धडपडत आहे. पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या काँन्व्हेंटमध्ये घालुन त्यांना समाजातील अन्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे शिक्षण देण्यासाठी वर्षाकाठी हजारो रूपयांचे डोनेशन देऊन शिक्षण देत आहे. ही परिस्थिती शहरासह ग्रामीण भागातही रूढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांसह नगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या रोडावत चालली आहे.