शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयासह तुमसर व पवनी येथे सिटीस्कॅन युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिटीस्कॅनचा मुद्दा ऐरणीवर आला होता. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातून सिटीस्कॅन करावी लागत होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत होता. आता लवकरच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त सिटीस्कॅन युनिटसह तुमसर आणि पवनी येथेही सिटीस्कॅन युनिट सुरू करण्यात येणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून दोन युनिट आणि जिल्हा नियोजन समितीतून एक युनिट उभारले जाणार असल्याची माहिती खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासून तयारी करावी. सध्या ऑक्सिजनचा जिल्ह्यात पुरेसा साठा असून, जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त सिटीस्कॅन युनिटसह तुमसर आणि पवनी येथील रुग्णालयात सिटीस्कॅन युनिट उभारले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी येथे दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार पटेल बोलत होते. बैठकीला आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिटीस्कॅनचा मुद्दा ऐरणीवर आला होता. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातून सिटीस्कॅन करावी लागत होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत होता. आता लवकरच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त सिटीस्कॅन युनिटसह तुमसर आणि पवनी येथेही सिटीस्कॅन युनिट सुरू करण्यात येणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून दोन युनिट आणि जिल्हा नियोजन समितीतून एक युनिट उभारले जाणार असल्याची माहिती खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने काय तयारी केली याची माहिती खासदार पटेल यांनी घेतली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. पीयूष जक्कल यांनी टीबी वॉर्डात लहान मुलांसाठी ५० बेडचे कोविड केअर युनिट उभारले जाणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आल्याची माहितीही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, धनंजय दलाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. माधुरी माथूरकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

सीएसआर अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या   ५० ऑक्सिजन सिलिंडर्सचे लोकार्पण - सीएसआर अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या ५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्सचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अदानी समूहाने कोरोना संकटात जिल्ह्याला मोठी मदत दिली. या ५० ऑक्सिजन सिलिंडरसोबतच आवश्यकतेनुसार आणखी १०० सिलिंडर भंडारा जिल्ह्याला दिले जाणार आहेत. तसेच १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सीएसआर अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, अदानी समूहाचे उपमहाव्यवस्थापक प्रवीण जयस्वाल उपस्थित होते.रब्बी धान खरेदी तत्काळ सुरू करा- जिल्ह्यात अद्यापही रब्बी हंगामातील धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश खासदार पटेल यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांना दिले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याprafull patelप्रफुल्ल पटेल