शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांनी अनुभवला थरार

By admin | Updated: August 1, 2015 00:10 IST

भंडारा शहरवासीयांसाठी गुरूवार 'काळा व थरारक' दिवस ठरला. शहरात म्हाडा वसाहतीत घडलेल्या भरदुपारच्या घटनेत एक युवती जखमी...

भंडारा : भंडारा शहरवासीयांसाठी गुरूवार 'काळा व थरारक' दिवस ठरला. शहरात म्हाडा वसाहतीत घडलेल्या भरदुपारच्या घटनेत एक युवती जखमी तर रात्री घडलेल्या घटनेत महिलेला ठार करून तिच्या मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनांचा शहरवासीयांनी थरार अनुभवला. या हल्ल्यामुळे नागरिकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांवर पाळत ठेवून रात्र जागून काढली.गुरूवारी मुंबई स्फोटातील याकूब मेमन याला नागपूर येथे फासी देण्यात आली. तर देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण केलेले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांच्या निधनाने त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम अशा दोन वेगवेगळ्या घटनेने देश आधीच ठवळून निघाला होता. या दोन्ही घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच भंडारा शहरात दुपारी व रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे अख्ख्या शहराने थरार अनुभवला.म्हाडा कॉलनीतील शिंदे यांच्या घरी सेल्समनच्या रूपात आलेल्या युवकांनी अश्विनी ही युवती घरात एकटीच असल्याची खातरजमा केल्यावर तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला. या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनास्थळावरील दृश्य बघून प्रत्येकांच्या चेहऱ्यावर भितीचे सावट दिसून येत होते.दिवस लोटून रात्र होत नाही तोच, पुन्हा शहरातील समृध्दीनगरात दुसरी घटना घडली. हल्लेखोरांनी हृदयाचा थरकाप उडविणारी व क्रूरतेची सिमा ओलांडत महिलेचा निर्दयणे खून केला व तिच्या आठ वर्षिय मुलाला गंभीर जखमी केले. दुपारच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच रात्री घडलेलेल्या या खूनामुळे शहरात नागरिकांची झोप उडाली होती. प्रत्येकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरील दृश्य घटनेची भयान वास्तव करीत होते. दोन्ही घटनेत रक्ताच्या थारोड्यात जखमी व मृतक पडून असल्याचे दृश्य नागरिकांच्या हृदयाचा थरकाप उडविणारा प्रसंग होता. या दोन्ही घटना शहरात घडल्या आणि त्याही केवळ सात तासाच्या अंतरात. दोन खूनी हल्ल्याच्या घटना घडल्याने शहरातील प्रत्येक नागरिकांचा चेहरा धीरगंभीर व भयभित झाला होता. नागरिकच काय तर आबाल वृध्दही या घटनेने चिंताग्रस्थ दिसत होते. हल्ल्याचे भयान दृश्य बघून अनेकजण अबोल झाले. कित्येकांनी केवळ डोळ्यांच्या इशाऱ्याची भाषा वापरून घटनेच्या तीव्रतेबाबत संताप व्यक्त केला.ऐव्हाणा, दोन्ही घटनेमुळे शहरवासीयांची झोप पूरती उडाली होती. शहरातील प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात या घटनेची चर्चा व त्याच्या भयानतेमुळे भीतीचे वातावरण सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होते. अनेकांनी तर रात्र जागून काढली. यादरम्यान शहरात अफवांना पेव फुटले होते. कुणी काहिही सांगो, त्यावर विश्वास ठेवून त्याची माहिती जाणून घेण्यासाठी सर्व धडपड करताना दिसत होता. वॉर्डात कोणी अनोळखी इसम दिसला तरी, त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून किंवा कुठे आवाजही झाला तरी नागरिकांचे कान त्याचा मागमूस घेवून भितीतच रात्र जागून काढली. (शहर प्रतिनिधी)नागरिकांनी सावध राहावेशहराची लोकसंख्या दिवसागणिक झपट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेकांच्या गरजा वाढत आहेत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेता, अनेक कंपन्यांनी प्रलोभन देवून घरपोच वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. यात अनेक विकृत व्यक्तींनी याचा गैरफायदा घेवून गोरखधंदा सुरू केला आहे. याचा फायदा घेत हे सेल्समॅन घरात शिरतात व असे कृत्य करतात. त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.