शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

वैनगंगा नदी तीरावरील गावातील नागरिक नाईलाजाने पितात दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालानंतरही उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा प्रशासनाच्या लेखी टँकरमुक्त असून विशाल पात्र असलेल्या वैनगंगेमुळे तशी पाणीटंचाई जाणवत नाही. परंतु वैनगंगेचे दूषित पाणी आता कळीचा मुद्दा झाला असून भंडारा आणि पवनी तालुक्यातील वैनगंगा तिरावरील तब्बल ६७ गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. प्रशासनाच्या वतीने जल शुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे. भंडारा तालुक्यातील ३३ आणि पवनी तालुक्यातील ३४ असे एकुण ६७ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहेत. बहुतांश गावाच्या पाणीपुरवठा योजना वैनगंगेवरून असून पाणी कितीही शुद्ध केले तरी त्याचा परिणाम होत नाही. सध्या वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला १० एनटीयू तर तळाशी १७ एनटीयू आहे. पाच एनटीयूचा स्तर सामान्य मानला जातो. वैनगंगा बचाव समितीने पाणी शुद्धीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी ६१७ गावे पाणीटंचाई उपाययोजनेत प्रस्तावित आहेत. जिल्ह्यातील ११६३ जलस्त्रोतांना पाणीटंचाईची झळ यंदा उन्हाळ्यात जाणवणार आहे.वैनगंगा नदीच्या तीरावर पिंडकेपार गाव असले तरी गावात बोअरवेल खोदून त्यावर नळ योजना कार्यान्वित आहे. जल शुद्धीकरण संयंत्र लावण्यात आले आहे. वैनगंगेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा कुणीही वापर करीत नाही. शुद्ध पाणी पुरवठा केला जातो.-कविता आतीलकरसरपंच, पिंडकेपारगणेशपूर वैनगंगेतून पाणी घेऊन ते शुद्ध करण्यात येते. परंतु १०० टक्के पाणी शुद्ध होत नाही. गावातील जलवाहिन्याही ४० टक्के जुन्या आहेत. आता गोसे प्रकल्पाच्या निधीतून नवीन विहिर तयार केली जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी अडीच कोटीचा प्रस्ताव आहे.-जया सोनकुसरेजि.प. सदस्य, गणेशपूरखमारी येथे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी वैनगंगा नदीपात्रापासून दीड किलोमीटर अंतरावर विहिर खोदण्यात आली आहे. पाणी जलकुंभात आणून नळाच्या द्वारे वितरीत केले जाते. गावात कुठेही सार्वजनिक आरो नाही. दूषित पाण्याचा परिणाम फारसा होत नाही.-कृष्णा शेंडेसरपंच, खमारीवैनगंगा बचाव अभियान नागरी समितीच्या वतीने वैनगंगा शुद्धीकरणासाठी लढा दिला जात आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे.-नितीन तुमाने, अध्यक्ष, वैनगंगा बचाव अभियान नागरी समिती

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण