शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांपासून रस्ता, नालीसाठी नागरिकांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येत असलेल्या तकीया वॉर्ड परिसरातील काही अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. परिणामी रस्ते व नाली बांधकामासाठी नागरिकांचा स्थानिक प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. निवेदन देवूनही समस्या सुटत नसतील तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्नही रहिवासी विचारीत आहेत.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक ८ : निवेदन देऊनही समस्या सुटेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येत असलेल्या तकीया वॉर्ड परिसरातील काही अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. परिणामी रस्ते व नाली बांधकामासाठी नागरिकांचा स्थानिक प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. निवेदन देवूनही समस्या सुटत नसतील तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्नही रहिवासी विचारीत आहेत.गत दोन दशकांपासून प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत मैदामीलच्या मागे व नविन म्हाडा कॉलनी यादरम्यान असलेल्या रस्ते बनलेले नाहीत. परिणामी नाल्यांचेही बांधकाम झालेले नाही. यासंदर्भात तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना येथील रहिवाश्यांनी समस्या सोडविण्यासंदर्भात मागणीचे निवेदन दिले होते.निवेदनात नमुद केल्याप्रमाणे प्रभागातील पाखमोडे यांच्या घरापासून ते लांबट यांच्या घरापर्यंत नविन पाणीपुरवठा जलवाहिनी घालण्यात यावी, तसेच याच मार्गावर नविन सिमेंट नाली व रस्त्याचे बांधकाम करुन द्यावे, अशी मागणी आहे. गत दशकांपासून याबाबत पालिकेला पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र समस्यांकडे पालिका पदाधिकारीही दुर्लक्ष करीत आहे. नाली नसल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असते. याचा सर्वात जास्त फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. पथदिव्यांची समस्याही भेडसावत आहे.मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात के. एम. मेश्राम, अंजू भांडारकर, सिंधू मते, लक्ष्मी मेश्राम, एन. के. साठवणे, सदानंद आगाशे, प्रणय मेश्राम, भजनकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षदोन दशकांपासून नविन म्हाडा वसाहतजवळील समस्या आवासून उभ्या असतांना पदाधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्ता व नालीसाठी पालकमंत्री ते पालिका पदाधिकाºयांपर्यंत निवेदन देवूनही त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.