शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
4
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
5
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
6
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
7
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
8
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
9
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
10
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
11
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
12
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
13
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
14
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
15
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
16
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
17
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
18
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
19
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
20
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 

साथीच्या आजाराने नागरिक बेजार

By admin | Updated: August 11, 2014 23:44 IST

कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक उन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

भंडारा : कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक उन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत अतिसार, हगवण, मलेरिया, थंडी, ताप, सर्दी, खोकला आदी आजाराने आबाल-वृद्ध त्रस्त झाले आहेत. पावसाचे अपेक्षित प्रमाण नसल्याने वातावरणात दमट हवामान निर्माण होवूनआरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल दिसत आहे. भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करून घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण झाली आहे. एकंदरीत तालुक्यात साथरोगाने थैमान घातले असताना प्रशसन मात्र सुस्तावले आहे. प ्रशसकीय स्तरावर कोणतीही बैठक घेण्यात आली नाही, आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. आजवर कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात अनेक रुग्णालय असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी धाव घेताना दिसत आहेत. सध्या चांगला पाऊस बरसल्याने पिण्याच्या पाण्यातील दोष यामुळे शहरासह तालुक्यात अनेकांना आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शहरात साथीच्या आजारात मोडल्या जाणाऱ्या ताप, सर्दी आदी आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. शहरासह तालुकाभर अधून मधून रिमझिम पाऊस त्यात सतत पावसाचे होणारे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी आरोग्य विभाग मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. (प्रतिनिधी)