शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

वृक्ष लागवडीसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: June 21, 2017 00:30 IST

प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. १ ते ७ जुलैपर्यंत आयोजित केलेल्या वृक्ष लागवड सप्ताहात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन...

नाना पटोले : १ ते ७ जुलैपर्यंत सप्ताहचे आयोजन, पीक देणाऱ्या वृक्षांवर भरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. १ ते ७ जुलैपर्यंत आयोजित केलेल्या वृक्ष लागवड सप्ताहात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन एक व्यक्त एक झाड लावून निसर्ग, पर्यावरणाचे जतन व संरक्षण करावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.राष्ट्रीय वननिती १९८८ मधील धोरणानुसार एकुण भौगिलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वनीकरण व वृक्षाच्छादन असणे आवश्यक असून महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतशील राज्य असून राज्यातील ३० हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ६१.३५ लाख हेक्टर म्हणजे २० टक्के इतकी जमीन वृच्छादित आहे. परंतु विविध कारणांमुळे वृक्षतोड तसेच कृत्रिम व नैसर्गिक वनवे, यामुळे घनदाट अरण्य ओसाड पडली असून जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच विविध प्रकारच्या घातक प्रदूषणामुळे जागतिक तापमानात वाढ झाली असून पर्यावरणीय बदलामुळे नैसर्गिक बदल झाल्याने अल्प व अनियमित पर्यन्यवृष्टी तर कधी ओला, कोरडा दुष्काळ पडत असतो. या विपरीत परिणाम वनस्पतीसृष्टी व प्राणी सृष्टीवर होऊन पीक उत्पादनात घट येत असते. सजीव प्राण्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतो. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून याबाबत बुद्धीवंत, प्रज्ञावंत, अभ्यासकांसह नागरिकांनी सम्यक विचार करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर यासाठी संबंधित यंत्रेणेने नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी, वनस्पती, जैवविविधता, दुर्मिळ वनसंपदा, औषधी वनस्पती यांचे रक्षण, संरक्षण आणि संवर्धन याबाबत जनजागृती करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करून वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगणे गरजेचे आहे. मागील वर्षी राज्यात सुमारे २ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या कार्यक्रम राबविण्यात आला. आता येणाऱ्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठावयाचे असून या कार्यक्रमात नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे महत्वाचे असून प्रत्येक कार्यालयाच्या सभोवताल, शाळा महाविद्यालयांनी विद्यालय परिसरात, ग्रामस्थांनी अंगण परिसरात तर शेतकरी बांधवांनी शेताच्या धुऱ्यावर, पडीत जमीनवर व सर्वांनी रस्त्याच्या कडेला आंबा, पेरू, जांभुळ, सीताफळ, बोर अशा नगदी पीक देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. प्रत्येक कार्यालय व शाळा महाविद्यालयांनी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे छायाचित्रण करावे व याबाबदचा कृती अहवाल दर्शनार्थासाठी जपून ठेवावयाची काळजी घ्यावी. निसर्ग पर्यावरणाचे संतुल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.