शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधक औषधीसाठी नागरिकांची गर्दी

By admin | Updated: August 30, 2014 23:27 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्ग क्रमांक २७१ वर असलेल्या मोहगाव खदान गावात पोळ्याच्या पाडव्याला विष प्रतिबंधक औषधींचे वाटप करण्यात आले आहे. यंदा ४० हजार नागरिकांनी या औषधीचा लाभ घेतला आहे.

चुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्ग क्रमांक २७१ वर असलेल्या मोहगाव खदान गावात पोळ्याच्या पाडव्याला विष प्रतिबंधक औषधींचे वाटप करण्यात आले आहे. यंदा ४० हजार नागरिकांनी या औषधीचा लाभ घेतला आहे.सर्पदंश वरिल विष प्रतिबंधक औषधीचे वाटप मोहगाव खदान गावात गेल्य ७० वर्षापासून पिपरेवार आणि चौरागडे कुटूंब करित आहेत. ही औषध नि:शुल्क वाटप करण्यात येत आहे. प्रती व्यक्ती औषधीचे सेवन करताना सतत तीन वर्षाचा कालावधी सांगण्यात येत आहे. या कालावधीचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्याचा मृत्यु होत नाही. त्याला अन्य औषधीउपचारासाठी बराच कालावधी प्राप्त होतो. विष प्रतिबंधक प्रक्रिया शरीरात ही औषध तयार करीत असल्याची माहिती औषध वाटप करणारे कुटूंबियांनी दिली. वर्षातून एकदाच पोळ्याच्या पाडव्याला ही औषध वाटप करण्यात येत आहे. औषधीचे कंद असल्याने गुळात मिश्रन केले जाते. या गुळाचे राशी घेतल्या जात नाही. औषधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांच्या गर्दीत वाढ हेत आहे. यंदा या नागरिकांची गैरसोय होणार नाही याकरीता गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या औषधी करीता मध्य प्रदेश, विदर्भ तथा मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून लहान मुलासह महिला व पुरूष हजेरी लावतात. पहाटे ४ वाजता नागरिकांची उपस्थिती राहत असल्याने, त्यांना सोयी देण्यासाठी उपाय योजना करण्यात आली.दावेझरी टोला गावाच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद शाळा व समाज मंदिरात औषधी वितरण करण्याची सोय करण्यात आली. पिण्याचे पाणी टँकरने उपलब्ध करण्यात आले. या शिवाय लहान बालकांचा समावेश असल्याने अल्पोहार वाटपाची सोय गावकऱ्यांनी उपलब्ध केली. या कार्यक्रमात अल्पोहार वितरण जि.प. सदस्य राजेश पटले यांचे हस्ते पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, बंटी बानेवार, सरपंच गिता कटरे, सरपंच गायत्री चौरागडे तथा गाकवऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. (वार्ताहर)