शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पकडले दारुचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:20 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : नागपूर येथून दोन वाहनांमध्ये दारु भरून ती भंडाऱ्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून खरबी नाका येथून सदर पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून एका वाहनाला ताब्यात घेतले तर अन्य एक वाहन ताशी १५० च्या वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. हा थरार मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर घडला.सीजी ...

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : महामार्गावर रंगला थरार

आॅनलाईन लोकमतभंडारा : नागपूर येथून दोन वाहनांमध्ये दारु भरून ती भंडाऱ्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून खरबी नाका येथून सदर पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून एका वाहनाला ताब्यात घेतले तर अन्य एक वाहन ताशी १५० च्या वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. हा थरार मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर घडला.सीजी १७ केसी १७१७ या वाहनातील दारु साठ्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत उपेंदरसिंग परशुरामसिंग (३८), सतनामसिंग अमरीकसिंग बैस (३३) दोन्ही राहणार रायपूर (छत्तीसगड) यांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांना नागपूर येथून सीजी १७ केसी १७१७ व एमएच ३४ के ७८६४ या चारचाकी वाहनातून भंडाऱ्याच्या दिशेने दारु भरून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरबी नाका येथे सापळा रचला. दरम्यान त्यांच्या दोन कर्मचाºयांना माथनी टोल नाका येथे पाठवून सदर क्रमांकाची वाहने भंडाऱ्याच्या दिशेने निघाल्याची माहिती पथकाला मिळाली. यानंतर सुरु झाला सिनेस्टाईल दारु वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा पकडण्याचा थरार.खरबी नाका येथे खासगी व शासकीय वाहनासह सापळा रचून उभ्या असलेल्या पथकाने दारु वाहतूक करणारे वाहन जवळ येताच त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही वाहन चालकाने पोलीस दिसताच तेथून धूम ठोकली. वाहन भरधाव निघाल्याने पथकानेही त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. राष्ट्रीय महामार्गावर हा थरार प्रत्यक्ष स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनुभवला. या पाठलागीत पेट्रोलपंप ठाणा जवळ सीजी १७ केसी १७१७ हे वाहन अडवून तपासणी केली असता त्या वाहनात १२ हजार ४८० रुपयांची देशी दारु आढळून आली. याप्रकरणी उपेंदरसिंग व सतनामसिंग यांना अटक केली. दरम्यान एमएच ३४ के ७८६४ च्या चालकाने तासी १५० च्या वेगाने वाहन पळवून पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. दारु तस्करांच्या वाहनाचा वेग बघता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वत:च्या व नागरिकांच्या संभावित जीवीतहानीचा धोका टाळण्यासाठी पाठलाग सोडला. संधी साधून दारु तस्कराने भंडारा हद्दीतून धूम ठोकल्याने पोलिसांनी केवळ एकाच गाडीवर कारवाई करण्यात धन्यता मानली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विजय पोटे, कमलेश सोनटक्के, प्रितीलाल रहांगडाले, वामन ठाकरे, बोरकर, चोपकर, मोहरकर, रेहपाडे, चव्हाण, रोशन गजभिये, चामट, स्नेहल गजभिये, कौशिक रामटेके आदींनी केली.