शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांच्या फसवणूक प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 21:57 IST

बेरोजगार युवक युवतींना नोकरीचे आमिष दाखवून लक्षावधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या विजय रणसिंग याला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. मंगळवारी दुपारी २ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने पीडित युवक युवती उपस्थित होते.

ठळक मुद्देमाजी आमदाराची मागणी : कोट्यवधींची झाली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बेरोजगार युवक युवतींना नोकरीचे आमिष दाखवून लक्षावधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या विजय रणसिंग याला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. मंगळवारी दुपारी २ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने पीडित युवक युवती उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाची नोकरी लावून देण्याच्या नावावर विजय रणसिंग नामक इसमाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. विजय राजेंद्र रणसिंग असे या भामट्याचे नाव असून त्याने स्वत:ला महिला व बालविकास विभागाचा उपसचिव असल्याचे सांगितले होते. तसेच ना.पंकजा मुंडे व त्यांच्या सचिवाशी घनिष्ठ संबंध असून नोकरीत तात्काळ लावून देतो असे आमिष तो बेरोजगारांना दाखवित असे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून स्वत:चे कार्यालय स्थापन केले होते. बेरोजगारांना नोकरी संदर्भात नियुक्तीची बनावट प्रमाणपत्रे व कागदपत्रे तो तयार करून देत असे. जिल्हाधिकारी कार्यालयात तो स्वत:च्या चारचाकी वाहनाने येत होता. त्या वाहनावर शासकीय राजमुद्रा अंकीत होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जातीने उपस्थित राहून विश्वास संपादन केल्यावर रणसिंग ने भंडारासह अन्य जिल्ह्यातील जवळपास २०० पेक्षा जास्त बेरोजगारांची फसवणूक केली. कुणाकडून तीन लाख तर कुणाकडून पाच ते १० लाखांपर्यंत वसुली केली. या सर्व प्रकरणात मंत्र्यांचाही हात असून जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधितांचीही चौकशी करावी अशी मागणीही नरेंद्र भोंडेकर यांनी केली.विशेष म्हणजे रणसिंग भंडारा येथे ज्या घरमालकाकडे राहायचा त्याचेही त्याने फसवणूक केली. या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन विभागाचाही समावेश असल्याने आरटीओ कार्यालयाचीही चौकशी करावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, जिल्हाधिकाºयांसह तत्कालीन दोषी असलेल्या अधिकाºयांवर नोंदवाा अशी मागणीही केली आहे.पत्रकार परिषदेला संजय रेहपाडे, अ‍ॅड.रवी वाढई, मुकेश थोटे यासह अन्य शिवसैनिक व पीडित बेरोजगार युवक युवती उपस्थित होते.