शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर जंगलात चितळाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 22:17 IST

जंगलात जाळे लावून चितळाची शिकार करणाऱ्या आरोपींवर पाळत ठेऊन लाखांदूर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सहा आरोपींना अटक केली.

ठळक मुद्देसहा आरोपींना अटक : शिकाऱ्यांकडून शस्त्र, साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : जंगलात जाळे लावून चितळाची शिकार करणाऱ्या आरोपींवर पाळत ठेऊन लाखांदूर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सहा आरोपींना अटक केली. ही कारवाई सोमवारच्या पहाटे अंतरगाव जंगलात करण्यात आली.गोविंदा मोहनकार (६७), विलास वाघधरे (२५), मन्साराम वाघधरे (३५), दुर्योधन वाघधरे (५०), सोमेश्वर खरोले (२५) सर्व रा.चिंचोली, संजय मडावी (३६) रा.अंतरंगाव अशी आरोपींची नावे आहेत. लाखांदूर या जंगलव्याप्त तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याची गोपणीय माहिती लाखांदूर वनअधिकाºयांना मिळाली होती. दरम्यान अंतरगाव वन कंपार्टमेंट क्रमांक २७१ मध्ये शेतातील बांधाजवळ झाडे कापून ठेवल्याचे दिसून आले. हा प्रकार वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी असल्याची शंका वन कर्मचाऱ्यांना आली.त्या आधारावर वनकर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व वनमजुरांनी जंगलात पाळत ठेवली होती.दरम्यान, सोमवारला पहाटेच्या सुमारास जंगलात काही माणसांचा आवाज येताच वनकर्मचारी आवाजाकडे लक्ष ठेऊन दबा धरून बसून होते. तितक्यात एक मोठे चितळ जाळ्यात अडकून पडताच सहा शिकारी भाला व कुऱ्हाडीने वार करीत होते. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी धाड घातली असता काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले तर एका आरोपींच्या सांगण्यावरून सहा आरोपींना अटक करण्यात आली. चितळ जाळ्यात अडकला त्यावेळी तो जखमी होता. परंतु पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचारादरम्यान या मादी चितळाचा मृत्यू झाला. वनपरिक्षेत्राअधिकारी कार्यालय परिसरात शवविच्छेदन करण्यात आले असता गर्भावस्थेत असलेल्या या चितळाच्या पोटातून मृत पिल्लू बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या चितळाला जाळण्यात आले. याप्रकरणी सहा आरोपींविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, २, (१६) (३५) (३६), ३९, ५०, ५१, व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४२ (२) अन्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.घटनेचा तपास उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनात साकोलीचे सहायक वनसंरक्षक एस. पी. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. दोनोडे, क्षेत्रसहायक व्ही.बी. पंचभाई, वनरक्षक बी.एस. मंजलवाड, एस.जी. जाधव, ए.जे. वासनिक, वनमजूर रामगडे, कुळसुंगे, वनव्यवस्थापन समितीेचे अध्यक्ष विद्वान नैताम यांनी केली.लाखांदूर वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपणीय माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. आता जंगलव्याप्त परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे.- आर. एस. दोनोडे,वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर.