शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मँगेनीज खाणींमध्ये चीनच्या मशीनची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:22 IST

मँगेनीजच्या अधिकाधिक उत्खननासाठी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) कंपनी चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील चिखला भूमिगत मँगेनीज खाणीत व्हर्टीकल मशीन दाखल झाली असून यामुळे कामगारांत धडकी भरली आहे.

ठळक मुद्देआधुनिकीकरणाचे नाव आठ हजार कामगारांना फटका बसण्याची शक्यता

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मँगेनीजच्या अधिकाधिक उत्खननासाठी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) कंपनी चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील चिखला भूमिगत मँगेनीज खाणीत व्हर्टीकल मशीन दाखल झाली असून यामुळे कामगारांत धडकी भरली आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातील दहा मॉईल कंपनीतील सुमारे आठ हजार कामगारांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात चिखला व डोंगरी बु. येथे ब्रिटीशकालीन दोन मँगेनीज खाणी आहेत. तर मध्यप्रदेशच्या बालाघाट आणि इतर राज्यात दहा मँगेनीज खाणी सध्या आहेत. येथे हजारो कामगार कार्यरत आहेत. चिखला येथे भूमिगत तर डोंगरी बु. येथे खुली खाण आहेत. चिखला खाणीत चीन येथील नवीन व्हर्टीकल मशीन नुकतीच आणण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापासून ही मशीन कार्यान्वित केली जाणार आहे. मॅग्नीज खाणीतून मँगेनीज काढण्याचे कामही या मशीननेच येथे येत्या काही दिवसापासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. डोंगरी बु., तिरोडी तथा अन्य दहा मँगेनीज खाणीत चीनच्या मशीनचा वापर केला जाणार असून तशी तयार मॉईल प्रशासनाने सुरु केली आहे.दहा मॉईल कंपनीतील सुमारे आठ हजार कामगारांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राष्ट्रीय मजदूर संघाने मँगेनीज ओर इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय मजदूर मंचच्या तुमसर शाखेने कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली आहे. मॉईल प्रशासन याबाबत कोणतीच माहिती देण्यास तयार नाही. सध्या मॉईलचा कामगारात अस्वस्थता दिसत आहे. चीनच्या मशीनची एंट्री वरिष्ठ स्तरावरून करण्यात आली असल्याने स्थानिक अधिकारी मौन पाळून आहेत.चीनच्या आधुनिक मशीन प्रत्येक मॉईलमध्ये दाखल झाल्या असून त्यांची सध्या स्थापनेची कामे सुरु आहेत. आधुनिक मशीनमुळे हजारो कामगार बेरोजगारीची शक्यता आहे. केंद्र शासनाने येथे दखल घ्यावी. कामागर संघटना विरोध करणार आहे.-हरिहर मलीकअध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर मंच, तुमसरचिखला मॉईलमध्ये चीनची एक मशीन आली आहे. परंतु कामगारांना काहीच फरक पडणार नाही. मॉईल अत्याधुनिक करणे हा त्या मागचे कारण आहे. केंद्रस्तरावर हा निर्णय घेतला जातो. स्थानिक पातळीवर काहीच होत नाही.-राजेश भट्टाचार्यमाईल प्रतिनिधी, डोंगरी व चिखला मॉईलकोटअत्याधुनिक चीन येथून मशीन आल्यावर निश्चितच कामगारांवर बेरोजागरीचे संकट कोसळणार आहे. परंतु हे खपवून घेतले जाणार नाही. कामगारांची गच्छंती झाल्यास त्यास तीव्र विरोध करण्यात येईल.-डॉ.पंकज कारेमोरेयुवा काँग्रेस नेते, तुमसर

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा