शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचा खून ; पित्याला जन्मठेप

By admin | Updated: January 1, 2015 22:55 IST

पत्नीने शरीर सुखाची मागणी फेटाळल्यामुळे स्वत:च्या दोन निष्पाप मुलांची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या आरोपी पित्याला जन्मठेपेची शिक्षा व ११ हजार रूपयांचा दंड तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे

गर्रा येथील प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेशभंडारा : पत्नीने शरीर सुखाची मागणी फेटाळल्यामुळे स्वत:च्या दोन निष्पाप मुलांची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या आरोपी पित्याला जन्मठेपेची शिक्षा व ११ हजार रूपयांचा दंड तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.बी. येणूरकर यांनी सुनावली. जितेंद्र सुरजलाल नेवारे (२८) रा.गर्रा, असे जन्मठेप सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकरण असे की, दि.१५ एप्रिल २०१३ रोजी जितेंद्र नेवारे याने पत्नीला शरीरसुखाची मागणी केली. मात्र मागणी फेटाळल्याने आरोपीने तीला धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.१६ एप्रिल २०१३ रोजी आरोपीची पत्नी सकाळी मजूरीच्या कामावर निघून गेली. आयुब (साडे तीन वर्ष) हा मुलगा सकाळी अंगणवाडीत गेला. तर आरूषी (दीड वर्ष) ही मुलगी घरी खेळत होती. आरोपीचा सासरा हा मोहाफूल वेचण्यासाठी गेला होता. आरोपीने मुलगी आरूषीला घेवून अंगणवाडीत गेला. अंगणवाडीतून त्याने आयुषला नेले. दोन्ही मुलांना घेवून बघेडा तलावाजवळ जाताना पाहणारी संगीता राऊत हिने आरोपीला आवाज दिला होता. परंतु त्याने कोणतेही उत्तर न देता निघून गेला होता. आरोपीचा सासरा मोहफूल वेचून घरी परत आला असता त्याला नातवंडे दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली. मात्र फायदा झाला नाही. आरोपी जितेंद्र नेवारे याला गावात शोधले असता तो मिळाला. त्याला विचारपूस केली असता मुलांना मी मारले, असे उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी जितेंद्रला बघेडा पोलीस चौकीत घेवून गेले. परंतु तो पोलीसासमक्ष काहीच बोलला नाही. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी ही माहिती तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांना दिली. त्यांनी रात्री गोबरवाही पोलीस ठाणे गाठले. यावेळी आरोपीची पत्नी ठाण्यात उपस्थित होती. तिने मुलांना जीवानिशी ठार मारून मृतदेह लपवून ठेवले आहे, अशी तक्रार पोलिसात केली. तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र नेवारे याच्याविरूद्ध भादंवि ३०२, २०१ कलमान्वये गुन्हे नोंदविले. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी यांनी केला. त्यानंतर तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपणपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षदारांना तपासण्यात आले. शवविच्छेदन अहवाल तपासण्यात आला. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद व साक्ष पुराव्यांच्या तपासाअंती तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. येणूरकर यांनी आरोपी जितेंद्र नेवारे रा. गर्रा (बघेडा) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. राजकुमार वाडीभस्मे यांनी युक्तीवाद केला. (नगर प्रतिनिधी)