भंडारा : लोकमत बालविकास मंच सत्र २०१५-१६ सदस्य नोंदणी ९ आॅगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शाळेतील वर्ग १ ते १० चे विद्यार्थी बालविकास मंचचे सदस्य होऊ शकतात. दि. २३ आॅगस्टला दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत या वेळेत लोकमत जिल्हा कार्यालयात सदस्य नोंदणी सुरु राहणार आहे. तेव्हा शालेय विद्यार्थ्यांनी या नोंदणीचा लाभ घ्यावा. सदस्य होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्मार्ट आयकार्ड, टिफीन बॉक्स, शोध स्टोरी बुक, डायमंड नमकिन, इडली मिक्स पॅकेट, सावजी मसाले, मॅजिक मिक्स मसाला, मॉडलिंग पोस्टकार्ड साईज फोटो नि:शुल्क काढून मिळेल. मास्टर टॅलेंट स्पर्धेत लॅपटॉप, टॅबलेट, प्लेस्टेशन, सायकल, बीन बॅग, बॅटमिंटन व उत्तेजनार्थ बक्षिस जिंकण्याची संधी मिळेल आणि राज्यस्तरीय लकी ड्रामध्ये हवाई सफरची मजा लुटण्याची संधीपण मिळू शकेल.वर्षभर होणारे शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा, मनोरंजन व प्रशिक्षणात्मक कार्यक्रमात सहभागी होता येईल. वार्षिक सदस्य शुल्क १५० रूपये असून एकूण ५०० रुपये किमतीच्या भेटवस्तु नि:शुल्क मिळतील. अधिक माहिती व नोंदणीकरिता लोकमत जिल्हा कार्यालय, साई मंदिर मार्ग, जिल्हा परिषद चौक, भंडारा किंवा बालविकास मंच संयोजक ९०९६०१७६७७ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)
बालविकास मंचची सदस्य नोंदणी रविवारीही
By admin | Updated: August 23, 2015 00:59 IST