शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित स्थळीच होणार मुख्यमंत्र्यांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:39 IST

तुमसर नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न डॉ.पंकज कारेमोरे यांचा होता. त्यामुळेच त्यांनी सदर जागेवर झाडे लावली होती. नगर पालिकेने ती झाडे अन्यत्र हलवून तिथे संरक्षकभिंत बांधण्याचे काम सुरु केले आहे.

ठळक मुद्दे चरण वाघमारे यांची स्पष्टोक्ती : प्रकरण तुमसर येथील जागेच्या वादाचे

ऑनलाईन लोकमतभंडारा : तुमसर नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न डॉ.पंकज कारेमोरे यांचा होता. त्यामुळेच त्यांनी सदर जागेवर झाडे लावली होती. नगर पालिकेने ती झाडे अन्यत्र हलवून तिथे संरक्षकभिंत बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे ४ फेबु्रवारी रोजी होणारी मुख्यमंत्र्यांची सभा नियोेजितस्थळीच होईल, अशी स्पष्टोक्ती आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत केली.बुधवारला दुपारी माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचे पुत्र डॉ.पंकज कारेमोरे यांनी आ.चरण वाघमारे, नगरसेवक श्याम धुर्वे यांना धक्काबुक्की करीत नगर पालिकेच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलीस तक्रारही करण्यात आली. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, तुमसर नगर परिषेदच्या स्थापनेला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. नगर परिषदेचा शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमासाठी ४ फेबु्रवारी रोजी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमसरात येत आहेत. संताजी सभागृहाजवळील मैदानावर त्यांची सभा होणार आहे. त्या जागेची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो असता त्याठिकाणी डॉ.पंकज कारेमोरे यांनी शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्या जागेवर मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे ती जागा चकोले नामक व्यक्तीने नगरपरिषदेला दान दिली आहे. काही वर्षापूर्वी ही जागा लिजवर देण्यात आली होती. आता ती लिज रद्द केल्यानंतर नगर पालिकेने जागा आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे त्या जागेवर तुमसर नगर पालिकेची मालकी आहे. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष सुनील मेंढे, प्रा.उल्हास फडके उपस्थित होते.