शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सडक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:39 IST

तालुक्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्त्याचे काम जोमाने सुरू असून, या योजने अंतर्गत पिपळगाव/को ते मडेघाट रस्त्याचे सुद्धा काम चालु आहे. मात्र या रस्त्यांच्या कामा दरम्यान खोदलेली माती शेतकऱ्यांच्या शेतात घातली गेली आहे. सद्या स्थितीत उन्हाळी पिकाची कापणी व पावसाळी पिकाच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

ठळक मुद्देरस्ता बांधकामातील माती शेतात : चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्त्याचे काम जोमाने सुरू असून, या योजने अंतर्गत पिपळगाव/को ते मडेघाट रस्त्याचे सुद्धा काम चालु आहे. मात्र या रस्त्यांच्या कामा दरम्यान खोदलेली माती शेतकऱ्यांच्या शेतात घातली गेली आहे. सद्या स्थितीत उन्हाळी पिकाची कापणी व पावसाळी पिकाच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पिंपळगाव/को येथील शेतकऱ्यांच्या शेतात रस्त्यांच्या बांधकामावरील माती टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मशागत करण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यात होत असलेली बहुतांश कामे एका कंञाटदाराला देण्यात आली असून, या सर्वच बांधकामांमध्ये निकृष्ठ दजार्चे बांधकाम करीत आहेत. सोमवारी खैरी/पट रस्त्याच्या निकृष्ठ बांधकामाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. प्रकाशित झालेली बातमी वाचून पिंपळगाव/को येथील शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीला भ्रमणध्वनी द्वारे माहीती दिली.पिपळगाव/को ते मडेघाट रस्त्याच्या बांधकामात कंत्राटदाराकडून होत असलेल्या मनमानी कारभाराची माहीती दिली असता, सदर प्रतिनिधींनी पिंपळगाव/को. येथे होत असलेल्या कामाची पाहणी केली असता, बांधकामासाठी खोदलेली माती शेतकºयांच्या शेतात टाकली असल्याचे दिसून आले आहे.शेतकºयांनी सांगितल्याप्रमाणे कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले असून, लाखांदुर तालुक्यात होत असलेली बहुतांश रस्त्यांच्या कामाचे कंत्राट त्यांना आहे. मात्र निकृष्ट बांधकाम करत काम पुर्ण करण्यास दिरंगाई केली जात आहे.खैरी/ पट, कुडेगाव येथील कामास होत असलेल्या दिरंगाई पाठोपाठ पिंपळगाव/को ते मडेघाट येथील रस्त्याच्या कामास देखील दिरंगाई केली जात आहे. यामुळे रहदारीच्या नागरीकांची डोकेदुखी वाढली आहे.पावसाळी पिकाच्या मशागतीच्या कामाला वेग आल्याने नांगरणी, धुºयांचे माती काम, तुरीची लागवड यासह अन्य कामे केली जात आहेत. मात्र शेतात माती टाकण्यात आल्याने शेतकºयांना शेतीची कामे करण्यास अडचण होत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री सडक योजना शेतकºयांच्या मानगुटीवर म्हणायची वेळ आली आहे. कंत्राटदार यांच्याकडून होत असलेली दबंगगीरीमुळे रस्त्याचे बांधकाम चालू असलेल्या गावातील नागरीक ञस्त झाले असून, संबंधित अभियंते शुक्ला व कापगते यांची कंत्राटदारासोबत मिली भगत असल्याचे बोलले जात आहे.सबंधित कंत्राटदार यांच्याकडून होत असलेला मनमानी कारभार व निकृष्ठ बांधकाम याबाबत संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून फोन उचलल्या जात नसल्याने संपर्क होत नाही. सदर कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करून कामाचे कंञाट दुसºयाला देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकºयांकडून होत आहे.