शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:23 IST

सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी येथे सन १९३४ पासून गणपती उत्सव स्वयंचलित चित्ररथ साकार करून साजरा केला जात आहे.

ठळक मुद्देश्रद्धाळू घेतात दर्शन : महाराष्ट्राच्या दोन तर मध्यप्रदेशातील एका मुख्यमंत्र्यांनी दिली होती भेट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी येथे सन १९३४ पासून गणपती उत्सव स्वयंचलित चित्ररथ साकार करून साजरा केला जात आहे. यावर्षी रामजन्माची चित्ररथ तयार करण्यात आले आहे. ब्रिटीशकाळात या गणेशोत्सवाची सुरुवात गोयनका कुटुंबाने केली होती. पूर्व विदर्भ, छत्तीसगड व मध्यप्रदेशातील हजारो भक्त येथे दरवर्षी येतात. येथील गणेश दर्शनाकरिता तत्कालीन मुख्यमंत्री, राज्यपाल यांनी भेटी दिल्या आहेत. पवनारखारीत दहा दिवस यात्राही भरते हे विशेष. येथील गणपतीला महाराष्ट्राचे दोन तर मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री व राज्यपालांनी भेट दिली होती.तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी हे आदिवासी बहुल गाव आहे. तुमसर पासून १८कि.मी. अंतरावर हे गाव असून एस.टी. व रेल्वेने या गावला भेट देता येते. व्यवसायीक गोयनका कुटुंबानी सन १९३४ पासून गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा तथा छत्तीसगड व जवळच्या मध्यप्रदेशातील हजारो भाविक येथे दर्शनाला दरवर्षी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. या गणपतीची वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षी येथे स्वयंचलित चित्ररथ तयार केले जातात. जे सर्वांचे आकर्षण केंद्र ठरते. दरवर्षी येथे सुमारे तीन लाख भाविक येथे दर्शनाला येतात. येथे मोठी यात्राही भरते. १९६४ मध्ये पवनारखारीला आदर्श गावाचा पुरस्कार मिळाला होता.पौराणिक प्रसंगावर आधारित येथील स्वयंचलीत चित्ररथ तयार केले जातात. पूर्वी येथे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली जात होत्या. येथील गणपतीची चर्चा एकेकाळी मुंबई, भोपाळपर्यंत होती.पवनारखारी येथील गणपती दर्शनाला तत्कालीन मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री पं.रविशंकर शुक्ला, राज्यपाल पट्टाभीसीतारामय्या, यशवंतराव चव्हाण व दादासाहेब कन्नमवार यांनी भेटी दिल्या होत्या.यावर्षी भगवान श्रीराम जन्म तथा त्यांचे बालपणांचे चित्ररथ तयार केले आहे. गोयनका कुटुंबातील वयोवृद्ध ८४ वर्षीय महाविरप्रसाद गोयनका लहानपणापासून चित्ररथाचे निर्माण करीत आहेत.पवनारखारी येथील गणपती दर्शनाकरिता गोबरवाही, सीतासावंगी, चिखला, नाकाडोंगरी, डोंगरी बु., बघेडा परिसरातील प्रत्येक घरी नातेवाईकांचे रेलचेल असते. दहा दिवस येथे विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाचे भक्त मोठ्या श्रद्धेने येथे येऊन गणरायाकडे विनवणी करतात.