शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

प्रकल्पग्रस्तांकडे मुख्यमंत्री फिरकलेच नाही

By admin | Updated: August 17, 2015 00:24 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे त्यांना निवेदन देण्यसाठी यासाठी हजारो प्रकल्पग्रस्त सकाळी ९ वाजतापासुन धरणस्थळी एकत्र आले होते.

हजारो प्रकल्पग्रस्त ताटकळत : संतप्त प्रकल्पग्रस्तांनी केली निवेदनाची होळीप्रकाश हातेल चिचाळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे त्यांना निवेदन देण्यसाठी यासाठी हजारो प्रकल्पग्रस्त सकाळी ९ वाजतापासुन धरणस्थळी एकत्र आले होते. परंतु प्रकल्पग्रस्त ज्याठिकाणी बसले होते. त्यास्थळाकडे मुख्यमंत्री फिरकलेच नाही. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आलेल्या निवेदनाची होळी केली. विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याचे कळताच पाथरी, सौंदड, नेरला, चिचाळ, सावरला या गावातील हजारो प्रकल्पग्रस्त त्यांना भेटण्यासाठी आतुरलेले होते. मात्र ज्या दिशेला प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या मांडला होता त्याच्या विरुद्ध दिशेने मुख्यमंत्री प्रकल्पस्थळी पोहोचल्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांना भेटताच आले नाही. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्त गेट क्रमांक एकवर एकत्रित येऊन शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत अनेक गावे बुडीत क्षेत्रात येतात. शासनाने बुडीत क्षेत्रातील गावाचे पुनर्वसन करण्याचे ठरविले. पुनर्वसनस्थळी भौतिक सुविधा उपलब्ध करुन न देता आश्वासन देऊन स्थलांतरण केले. स्थलांतरीत झालेल्या नविन गावठाण्यात पर्यायी भौतिकसुविधा नाहीत. बाधीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना रोजगार नाही त्यामुळे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुशिक्षीत तरुण रोजगाराअभावी वणवण फिरत आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यापासून लाभक्षेत्रातील शेतकरी श्रीमंत होतील तर घरे देणारे मात्र उपवासाने मरत आहेत. प्रकल्पग्रस्तांना नोकरी नाही नोकरी द्यावी, अन्यथा नोकरी देण्यात यावी. व्यवसायासाठी अनुदान रक्कम देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनात प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी. अन्यथा २० लाख रुपये देण्यात यावे, पेंशन देण्यात यावी, धरणाच्या पाण्यापासून मिळणाऱ्या महसुलापैकी ५० टक्के महसुल प्रकल्पग्रस्तांवर खर्च करण्यात यावे, पाथरी येथील प्रकल्पग्रस्तांना विद्युत खर्च देयाची चार टक्के रक्कम त्वरित देण्यात यावी, जुन्या विद्युत मीटरच्या बदल्यात नवीन विद्युत मीटर द्यावा, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी १० लाख रुपये अनुदान द्यावा, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदावर बुडीत क्षेत्रातील लोकांना नोकरी देण्यात यावी, नवीन गावठाण्यातील अतिक्रमण हटवून सिमांकण करुन दयावे, नवीन गावठाण पाथरी येथे बँक, पोस्ट आॅफिस आरोग्य केंद्र, क्रिडांगण या सुविधा देण्यात याव्या, पाथरी पूनर्वसनात नळ पाईप लाईन बदलवून नविन स्टॅड पोस्ट वाढवून दयावे, नविन गावठाण्यात सोडलेली शेतजमीन संपादीत करावी, भुसंपादन आधि नियमानुसार शेतजमनीची चार पट रक्कम देवून नविन अधिनियमानुसार सोयीसवलती देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांना बीपीएलच्या यादीत समाविष्ट करावे आदी मागण्या होत्या. मोर्चाचे नेतृत्व गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सहयोजक विलास भोंगाडे, सरपंचा रिना भुरे, सोमेश्वर भुरे, किशोर समरित, केशव हटवार, नंदलाल भुरे, राजु भुते सरपंच सौंदड, विजय निंबार्ते, हिवराज कुर्झेकर, माधुरी कुर्झेकर, सिंधू कुर्झेकर, पुष्पा मारबते, देवांगणा दाळे, मीरा भुरे, प्रमोद हटवार, सुनील शेंद्रे, केवळराम मरघडे, होमराज कुर्झेकर, इश्वर कांबळी, विलास मेश्राम, दादा आगरे, झिंबल शेंडे, विश्वनाथ वाडीभस्मे, झिंगरे, भुरे, किसन मरघडे, समिक्षा गणवीर, दुलाराम चुधरी, शारदा गाढवे, अंताराम हटवार, कुंदा कांबळे, जयशिला भुरे, जनाबाई भुरे, हेमलता बोरकर, सत्यफुला तागडे, पौर्णिमा बोरकर, करुण मरघडे, सिताबाई किरमरे, मेघनाथ हटवार यांच्यासह हजारो ग्रकल्पग्रस्त यावेळी उपस्थित होते.गोसेखुर्द भेट ठरला देखावागोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होण्यात ज्या अधिकाऱ्यांनी चुका करुन ठेवल्या आहेत, अशांंकडूनच मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. या प्रकल्पाचे काम ज्या कंत्राटदारांनी केले आहेत. ते आता त्यांच्या पक्षात आमदार आहेत. त्यामुळे ही भेट केवळ देखावा ठरली असून त्याविरुद्ध २१ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. - अ‍ॅड.गोविंद भेंडारकर,संयोजक, गोसेखुर्द संघर्ष समितीप्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीगोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पहिल्यांदा आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळालाही भेटण्याचे नाकारल्याने तो लोकशाहीचा अपमान ठरला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कमालिची नाराजी व्यक्त केली आहे.- विलास भोंगाडेसंयोजक, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती