शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिचाळ येथे ४५ वर्षांपासून आखाड्याची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:25 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरतपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ४० मल्लांनी सहभाग नोंदविला. अ‍ॅड.देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे.

ठळक मुद्दे४० पहेलवालांचा सहभाग : पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी

प्रकाश हातेल।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरतपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ४० मल्लांनी सहभाग नोंदविला. अ‍ॅड.देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे.जिल्ह्यातील विविध शारीरिक खेळोत्तेजक मंडळ व शारीरिक खेळ लोप पावत चालले आहेत. विज्ञानाने जरी मानवाची प्रगती केली असली तरी शैक्षणिक क्षेत्रात शारीरिक शिक्षणाचे अभाव जाणवत आहे. प्रत्येक गाव खेड्यात रात्रीला एक तास चालणारे आखाडे बंद पडले आहेत. मात्र चिचाळ येथील अ‍ॅड.देवीदास वैरागडे यांनी स्वखर्चाने ही परंपरा जोपासत असल्याने ही आखाड्याची ४५ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.सालाबादाप्रमाणे या वर्षाला पवनी तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर बाजार चौक चिचाळ येथे आखाड्याचे आयोजन अ‍ॅड.देवीदास वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. उपस्थित जयराम दिघोरे, मनोज वैरागडे, दिवारू वाघधरे, मुखरु वैद्ये, रामकृष्ण वैरागडे, देवराम वाघधरे, श्रीकृष्ण काटेखाये, शंकर मांडवकार, दिनेश नंदपुरे, मुनीर शेख, मोहन हरडे, जगतराम गभणे, ईश्वर काटेखाये, महादेव उके, माणिक वैरागडे आदी उपस्थित होते.सर्वप्रथम बजरंगबली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या आखाड्यात पंचक्रोशितील व परजिल्ह्यातील ४० मल्ल्यांच्या कुस्तीचे प्रदर्शन दाखविण्यात आले. यामध्ये प्रवीण वासनिक, मोहित काटेखाये, तुळशीराम कुंभळे, तृणाल जिभकाटे, अरविंद ठाकरे, कार्तीक चाचेरे, सागर डोकरीमारे, वैभव बिलवणे, रोशन मेश्राम, विशाल बिलवणे, मंगेश अहिर, उमेश वाघधरे, केशव लेदे, विनायक बनकर, अमोल तितीरमारे, अश्विन बिलवणे, दिनेश अहिर, कैलाश फुंडे, भावेश ठवकर आदी मल्लांनी हजेरी लावली होती. विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह, बनियान, टावेल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पराभूत मल्लांनाही बनियान टॉवेल देण्यात आले. पंच म्हणून जयराम दिघोरे, देवराम वाघधरे, ईश्वर वैद्य यांनी सांभाळले. कार्यक्रमाचे संचालन आदर्श शिक्षक मुख्याध्यापक यशवंत लोहकर व आभार परसराम दिघोरे यांनी केले.