शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रसायनमिश्रित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: August 6, 2015 01:45 IST

दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाण्याचा पिवळसर - काळसर पुरवठा केला जात आहे.

महिलांमध्ये संताप : नाग नदीच्या पाण्याचा भंडारावासीयांना फटकाभंडारा : दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाण्याचा पिवळसर - काळसर पुरवठा केला जात आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न केव्हाही ऐरणीवर येऊ शकतो. सरळसरळ मानवी आरोग्याशी जुळलेल्या या प्रश्नावर पालिका प्रशासन गंभीर आहे की नाही, हा विषय चर्चेचा असला तरी पिवळसर पाण्याचा पुरवठा का होतो? व कुठल्या प्रकाराने होतो यासाठी पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. यासाठी पाण्याचे नमुने पाठविण्यात आल्याची माहिती असून अहवाल आल्यानंतरच उपाययोजना केली जाण्याचे संकेत आहेत. वैनगंगा नदीच्या पात्रातून पाण्याचा उपसा करून भंडारेकरांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पुरवठा करण्यापूर्वी ग्रामसेवक कॉलनीस्थित असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे तर भंडारेकरांना मिळणारे पाणी हे पिवळसर का असते हा एक प्रश्न सर्वांनाच मागील दोन वर्षांपासून भेडसावत आहे. शहरातील काही भागात काळसर तर कुठे तेलयुक्त पाणीही मिळत आहे. पाण्याच्या या पुरवठ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गर्भश्रीमंत फिल्टरद्वारे पाणी शुद्ध करून पित आहेत. मात्र गरिबांचे काय, असा सवाल जनसामान्यांना पडला आहे. यासंबंधी नगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने पिवळसर पाण्याचा पुरवठा का होत आहे यासाठी पाण्याचे नमुने ‘नीरी’ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती आहे. वैनगंगा नदीतून पाण्याचा उपसा केल्यानंतर शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरण दरम्यान पाण्यात क्लोरिन मिसळविल्यानंतर त्याचा रंग पिवळसर होत असल्याचे प्रथम सुकृतदर्शनी अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे वैनगंगा नदीत गोसेखुर्द धरणाचे ‘बॅक वॉटर’ भंडारा नदीपात्रापर्यंत पोहचलेले असल्याने त्यात नाग नदीच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. याउपरही भंडारा शहरातील कालबाह्य झालेली जलवाहिनी या समस्येत भर घालत आहे. यावर पालिका प्रशासनाने वेळेपूर्वीच ठोस पावले उचलावीत अशी मागणी भंडारेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)