शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:38 IST

केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीला धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी वाढ करून धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा डांगोरा पिटला. मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या किमतीत प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची गळचेपी : दीडपट हमीभाव केवळ स्वप्नरंजन, खतांच्या दरात २५० ते ३०० रुपयांची वाढ
<p>हरिश्चंद्र कोरे।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीला धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी वाढ करून धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा डांगोरा पिटला. मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या किमतीत प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले आहेत. सद्यस्थितीत शेतकरी धान रोवणीची निगा घेत रासायनिक खतांची मात्रा देऊन विविध औषधांची फवारणी करीत आहेत. यंदा मे महिन्याच्या तुलनेत सध्या खतांच्या दरात सरासरी २५० ते ३०० रुपयांनी वाढ झाल्याचे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच गतवर्षी धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लुबाडणूक करण्यात आली. यंदा केंद्र शासनाने धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी भरीव वाढ करून शेतकºयांना दिलासा दिला. परंतु लागलीच रासायनिक खतांच्या दरात वाढ करून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे स्वप्न धुळीस मिळविले. परिणामी शासनाने दीडपट हमीभाव दिल्याचा कांगावा करून केवळ शेतकऱ्यांचे स्वप्नरंजन केल्याचा आरोप काही जाणकार शेतकऱ्यांनी केला आहे.वस्तू व सेवा कराने वाढविली डोकेदुखीखते, बियाणे, औषधे आदी शेती साहित्यावर सरकारने वस्तू सेवा कर लादला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरुपात पैसा येत असला तरी लादण्यात आलेल्या वस्तूसेवा कराने शेतकऱ्यांसह कृषी केंद्र चालकांची डोकेदुखी वाढविली आहे.माल एकच पण दर वेगवेगळेफर्टिलायझर साहित्यावर सरकारने ५ टक्के कीटकनाशकांवर १८ टक्के तर काही कृषी साहित्यावर १२ ते १८ टक्के वस्तू व सेवा कर लावला आहे. सध्या हा कर शेतकऱ्यांसह कृषी केंद्र चालकांच्या अडचणीत भर टाकत असून खतांचा माल एकच असताना वेगवेगळ्या कंपन्या आपले उत्पादन वेगवेगळ्या दरात विकत आहेत. परिणामी शेतकरी यात विनाकारण भरडल्या जात आहे.