शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून दिसून आले.

ठळक मुद्देसावध पवित्रा : शासकीय कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या काळात शासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुठलीच तपासणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ ने रिअ‍ॅलिटी चेकच्या माध्यमातून पुढे आणले होते. याच वृत्ताची दखल घेत आता शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी केली जात आहे. पंंचायत समिती कार्यालयात सॅनिटायजर तर तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर एका शिपायाची नियुक्ती केली आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून दिसून आले. ‘लोकमत’मध्ये या आशयाचे वृत्त धडकताच तालुका महसूल प्रशासनाने याची दखल घेतली. गत आठवड्यात लोकमत प्रतिनिधीने तहसील कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तथा जिल्हा उद्योग केंद्र व अन्य कार्यालयांची अवस्था जाणून घेतली. मात्र कुठेही थर्मल स्कॅनिंग होत नसल्याची बाब समोर आली होती. फक्त जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर तपासणी होत असल्याचे दिसून आले होते. मात्र अन्य शासकीय कार्यालयात याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. यावर ‘लोकमत'ने जनजागृती अंतर्गत वृत्त प्रकाशित केले. यासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने शासकीय कार्यालयांचा फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी सॅनिटायजर व्यवस्था होती. तहसील कार्यालयातही मुख्य प्रवेश द्वारावर शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. पण प्रशासकीय इमारतीत कोणतीच सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली नव्हती.जिल्हा न्यायालयात येणाऱ्यांची नोंदणीयेथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी प्रवेशद्वारावर केली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे २२ मार्चनंतर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही याची अंमलबजावणी सुरू होती. स्वच्छता व आरोग्याबाबत जिल्हा न्यायालय प्रशासनाने चांगली काळजी घेतली आहे. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस केली जात असल्याचे दिसले. येथे पोलिस कर्मचाऱ्यांचीही निगराणी असते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या